
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र तरी देखील इराण काही माघार घेण्यास तयार नाहीये. इराणच्या मिसाईल हल्ल्यांमुळे इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला आहे. तर दुसरीकडे इराणच्या मिसाईल हल्ल्यांमध्ये अमेरिकन सैन्यांची तळच्या तळं उद्ध्वस्त झाली आहेत. इराण कडून सुरू असलेल्या मिसाईल हल्ल्यांना थांबवायचं तरी कसं याचं उत्तर अजूनही अमेरिका आणि इस्त्रायलला मिळालेलं नाही. इराणकडून केवळ इस्त्रायल आणि अमेरिकेलाच लक्ष्य केलं जात नाहीये, तर ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं आहेत, त्या देशांवर देखील इराणने हल्ला केला आहे. मात्र हे युद्ध सुरू असतानाच इराणकडून एक मोठी चूक झाली आहे, आणि या चुकीची मोठी किंमत इराणला मोजावी लागू शकते. आता या युद्धात नाटो देशांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
या युद्धाचा आज 16 दिवस आहे. युद्धाच्या 16 व्या दिवशी मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इराणकडून कुवेतमध्ये असलेल्या अल सलेम एअर बेसवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. या एअरबेसवर अमेरिका आणि इटली या दोन्ही देशांचं संयुक्त सैन्यदल होतं, या हल्ल्यामध्ये इटलीच्या एअर फोर्टचं एक रिमोट पायलेटेड विमान पूर्णपणे नष्ट झालं आहे. या हल्ल्याबाबत इटली सरकारकडून रविवारी माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात इटलीचं एक विमान नष्ट झालं आहे, मात्र कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये, असं इटलीने म्हटलं आहे.
याबाबत बोलताना इटलीच्या सुरक्षा स्टाफच्या प्रमुख लूसियानो पोर्तोलानो यांनी सांगितलं की, कुवेतमधील अली अल सलेम एअरबेसला लक्ष्य बनवण्यात आलं आहे. या हल्ल्यामध्ये आमचं एक एअरक्राफ्ट नष्ट झालं आहे. दरम्यान या हल्ल्यापूर्वी इराणकडून इशारा देखील देण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान अमेरिका आणि इटली हे नाटोचे दोन प्रमुख सदस्य असल्यानं आता या युद्धात नाटोची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.