
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, आज युद्धाचा 21 वा दिवस आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचदरम्यान आता इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलला मोठी धमकी देण्यात आली आहे. मात्र या धमकीमुळे संपूर्ण जगाची झोप उडण्याची शक्यता आहे. जगभरातील पार्क, मनोरंजन क्षेत्र आणि पर्यटनस्थळं इथून पुढे इराणच्या शत्रूंसाठी सुरक्षित नसतील अशी थेट धमकी इराणी सैन्याच्या मुख्य प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे. इराणी सैन्य दलाचे मुख्य प्रवक्ता अबोलफजल शेकरची यांनी शुक्रवारी इराणच्या सरकारी न्यूज चॅनलला मुलाखत देताना अमेरिका आणि इस्त्रायलला ही धमकी दिली आहे. आता इथून पुढे इराणच्या शत्रूंसाठी जगातील कोणतीच जागा सुरक्षित नसेल असं शेकरची यांनी म्हटलं आहे.
जगाची झोप उडाली
दरम्यान इराणच्या या धमकीनंतर जगभरातल्या देशांची चिंता वाढली आहे. या धमकीनंतर असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे की, मध्य पूर्वेच्या बाहेर ज्या -ज्या देशात इस्त्रायल आणि अमेरिकेचे समर्थक आहेत, त्या ठिकाणी इराण थेट हल्ला करणार की दहशतवादी हल्ले घडवून आणणार? की ही इराणने आपल्या शत्रू राष्ट्रांना दिलेली फक्त एक धमकी आहे? याचदरम्यान इस्त्रायलने इराणवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणचे अनेक टॉप कंमांडर अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत.
इराणचा मोठा इशारा
आपल्या धमकीमध्ये इराणी सैन्याच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे की, आमच्याकडे तुमची सर्व माहिती आहे. याच आधारावर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल तरी देखील तुम्ही आमच्यापासून सुरक्षीत नाहीत. तसेच आमच्यावर कितीही भीषण हल्ले झाले तरी देखील आम्ही मिसाईल बनवणं सुरूच ठेवलं असल्याची माहिती देखील यावेळी इराणच्या प्रवक्तव्याने म्हटलं आहे.
आखाती देशांवर हल्ले सुरूच
दरम्यान ज्या -ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळे आहेत, त्या-त्या देशांवर इराणने हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये आखाती देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे.