मोठी बातमी! इस्त्रायलचा थेट भारताला फोन, अमेरिकेबाबत केला सर्वात मोठा खुलासा, आता पुढे काय होणार?

मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.

मोठी बातमी! इस्त्रायलचा थेट भारताला फोन, अमेरिकेबाबत केला सर्वात मोठा खुलासा, आता पुढे काय होणार?
netanyahu
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 3:25 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, अजूनही होर्मूजची सामुद्रधुनी सुरू झालेली नाही, त्यामुळे जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. होर्मूजची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे अमेरिकेवर देखील प्रचंड दबाव वाढला आहे. त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यानी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला आहे. इस्त्रालयच्या परराष्ट्र मंत्र्याने एस जयशंकर यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. याबाबत जयशंकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. मंगळवारी दुपारी इस्त्रायलमधून फोन आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन साआर यांनी एस जयशंकर यांना फोन करून लेबनॉन, इराण सोबतच होर्मूज सामुद्रधुनीवर सुरू असलेल्या तणावाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांनी यावेळी युद्धविरामावेळी अमेरिकेनं ज्या अटी घातल्या होत्या त्या अटीचं समर्थ देखील यावेळी इराणकडून करण्यात आलं. एस जयशंकर यांच्याशी बोलणं झाल्यानंतर इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. आमचा मित्र असलेल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत आमचं बोलणं झालं. आम्ही यावेळी लेबनॉन, इराण आणि स्ट्रीट ऑफ होर्मूजवर चर्चा केली, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे बोलताना इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असं देखील म्हटलं की, अमेरिकेकडून इराणविरोधात कडक पाऊलं उचलण्यात आली आहेत. इराणने अण्वस्त्र निर्मितीपासून थांबवणं हाच त्यामागचा उद्देश आहे, आणि त्यातच संपूर्ण जगाचं हीत आहे. इराणकडून स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करून आर्थिक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. यामध्ये आमचा मित्र भारतासारख्या देशाचा देखील समावेश आहे, असंही आपण यावेळी एस जयशंकर यांना बोलल्याची माहिती इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान सध्या या युद्धात अमेरिका एकटी पडल्याचं दिसून येत आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं आहे, मात्र तरी देखील एकही देश सध्या अमेरिकेच्या मदतीला आला नसल्याचं पहायला मिळत आहे. तीच अवस्था काहीशी इस्त्रायलची देखील होऊ शकते, त्यामुळे आता इस्त्रायल आणि अमेरिकेकडून जास्तीत जास्त देशांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न होत आहे, याचाच एक भाग म्हणून इस्त्रायलने आता भारताला फोन केल्याची चर्चा होत आहे.

Follow Us