November Rule Change : रेल्वे तिकीट बुकिंगचा हा नियम माहिती असणे खूप गरजेचे, अन्यथा तिकीट मिळणारच नाही!

तुम्ही IRCTC अॅप किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन रेल्वेचे तिकीट बुक करत असाल तर हा नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. हा नियम अॅडव्हान्स तिकीट बुकिंगसंदर्भात आहे.

November Rule Change : रेल्वे तिकीट बुकिंगचा हा नियम माहिती असणे खूप गरजेचे, अन्यथा तिकीट मिळणारच नाही!
irctc advance railway ticket booking rule
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 7:13 PM

 IRCTC New Rule : भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असा कुठलाही प्रवास करायचा असेल तर त्या भागात तुम्हाला रेल्वेने जाता येतं. विशेष म्हणजे रेल्वेने केलेला प्रवास हा सर्वात सुरक्षित मानला जातो. म्हणूनच रेल्वेने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ही कोट्यवधी आहे. लोकांना प्रवास करणं सोपं आणि सोईचं व्हावं यासाठी रेल्वे विभागातर्फे नियमांमध्ये वेळोवेळी बदल केला जातो. रेल्वेचा असाच एक महत्त्वाचा नियम आहे. हा नियम माहिती नसेल तर तिकीट मिळणे कठीण होऊ शकते.

महत्त्वाचा नियम नेमका काय?

तुम्ही IRCTC अॅप किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन रेल्वेचे तिकीट बुक करत असाल तर हा नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. हा नियम अॅडव्हान्स तिकीट बुकिंगसंदर्भात आहे. या नियमाअंतर्गत 60 दिवसांअगोदरच तुम्हाला असे तिकीट बुक करता येते. अॅडव्हान्स ट्रेन तिकीट बुकिंगचा कालावधी याआधी 120 दिवसांचा होता.

Loading...

या नियमाचा फायदा काय?

अगोदर प्रवासाचे तिकीट 120 दिवसांच्या अगोदरच बुक करता यायचे. अॅडव्हान्स ट्रेन तिकीट बुकिंगवरच लागू असलेला हा नियम 60 दिवसांचा करण्यात आला. या नियमामुळे प्रवाशांना खूप फायदा होतो. काही लोक अगोदरपासूनच तिकीट बुक करून ठेवायचे. त्यामुळे इतर प्रवाशांची अडचण व्हायची. ही अडचण होऊ नये म्हणून अॅडव्हानस तिकीट बुकिंचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे. हा नियम 2024 सालीच बदलण्यात आलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us