
पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात हिंसक निदर्शनाने सर्वजण हैराण झाले आहेत. या निदर्शनात तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. केंद्राने निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवून परिस्थिती कशीबशी नियंत्रणात आणली आहे. इंटनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कर्फ्यु कायम असून तणावग्रस्त वातावरण कायम असून जर बंदोबस्त काढला तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल असा आरोप विरोधक करीत आहेत. आतापर्यंत २०० जणांना अटक झाली आहे. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणा या आंदोलनामागे बांगलादेशाचा हात असल्याचा संशय आहे.
पश्चिम बंगालचे मुर्शिदाबाद पेटले होते. याठिकाणी वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शनांना हिंसक वळण लागून मोठी जाळपोळ गेले काही दिवस सुरु होती. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका होत आहे. केंद्राने निमलष्करी तुकड्या पाठवून परिस्थितीला आटोक्यात आणले आहे. असे असताना पोलिसांनी तपास करुन २१० लोकांना अटक केली आहे. यात काही असामाजिक तत्वांना हाताशी धरुन शेजारच्या बांगलादेशातील अस्वस्थ गटांनी भारतात हिंसा भडकावी यासाठी हालचाली केल्याचा तपास यंत्रणांना दाट संयश आहे. बांगलादेशातील काही गटाचा या हिंसक निदर्शकांना उकसवण्यात हात असल्याचे तपास यंत्रणांना आढळले आहे असे केंद्रीय गृहमंत्रालयाने प.बंगालच्या प्रशासनाला कळविल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
केंद्रिय गृहमंत्रालयाने केलेल्या तपासात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकार घुसखोरांवर नजर ठेवण्यास अपयशी ठरली आहे. वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने करताना मुर्शिदाबाद जिल्हा आणि दक्षिण २४ परगना येथे अशांतता पसरवली गेली. ज्यात तीन जणांचा मृत्यू झालातर अनेक जण जखमी झाले आहेत.
वक्फ संपत्तीचे नियमन करणारा हा कायदा असला तरी काही मुस्लीम समुदायातील काही वर्ग येथे मुस्लीमांची जमीन हिसकावण्याचा हा प्रयत्न म्हणून पाहात आहेत. सरकारने हा कायदा या जमीनीचा गरीब मुस्लीमांच्या उन्नती आणि प्रगतीसाठीच वापर करणार असल्याचे सांगत विरोधकांचा दावा फेटाळून लावला आहे.
मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सुती आणि समसेरगंजमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात हिंसक निदर्शने झाली होती. त्यानंतर समाजकंटकांनी अनेक दुकाने आणि वाहने जाळली आहेत. स्थानिकांच्या घरादारांवर दगडफेक केली आहे. ११ एप्रिल रोजी मुस्लीम बहुल जिल्ह्यात अशांती पसरल्यानंत मोठ्या संख्येने स्थानिक जनतेने पलायन करुन सुरक्षित जागांवर आश्रय घेतला आहे.
या हिंसाचारानंतर बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. कोलकाता हायकोर्टाने देखील याची दखल घेऊन या संवेदनशील परिसरात केंद्रीय सुरक्षा दलाचा बंदोबस्त देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शांततेचे आवाहन करीत हा वादग्रस्त कायदा राज्यात लागू देणार नाही असे म्हटले आहे.
मुर्शीदाबाद जिल्ह्यातील परिस्थिती आता नियंत्रणात असून आतापर्यंत १२० लोकांना सीसीटीव्हीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. बांगलादेशाच्या सीमेवर असलेल्या या भागात साल २०११ च्या जनगणनेनुसार ६६ टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे.