तुमची गाडी जुनी झालीय का ? आतापर्यंत 2.45 लाख वाहने स्क्रॅप, स्क्रॅपची पॉलीसी काय, फायदा आणि नुकसान ?

सरकारने १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहने आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांना स्क्रॅप करण्याचे धोरण बनवले आहे.हे धोरण २०२१ मध्ये सुरू झाले. आतापर्यंत २.४५ लाख वाहने स्क्रॅप करण्यात आली आहेत. जर तुमचे वाहन जुने असेल तर तुम्ही ते स्क्रॅप करण्याची तयारी ठेवावी.

तुमची गाडी जुनी झालीय का ? आतापर्यंत 2.45 लाख वाहने स्क्रॅप, स्क्रॅपची पॉलीसी काय, फायदा आणि नुकसान ?
| Updated on: Jun 24, 2025 | 5:14 PM

देशभरात आता १० वर्षे जुन्या डिझेल आणि १५ वर्षे जुन्या पेट्रोल कारना स्क्रॅप केले जात आहे. केंद्र सरकारच्या स्क्रॅप पॉलीसीच्या धोरणाने वेग पकडला आहे.आता याचा परिणाम प्रत्येक राज्यांत स्पष्ट दिसत आहे.जी जुनी वाहने सर्वाधिक प्रदुषण करीत आहेत आणि रस्त्यावरील सुरक्षेस बाधक ठरली आहेत त्यांना आता रस्त्यांवरुन काढून टाकण्यात येणार आहे. या धोरणात आता अशा वाहन मालकांसाठी प्रोत्साहन योजना देखील आणली आहे.

काय आहे स्क्रॅपिंग पॉलीसी ?

केंद्र सरकारने 13 ऑगस्ट 2021 रोजी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीची सुरुवात केली होती. या धोरणाचा मुख्य उद्देश्य १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोलवरील कारना सुरक्षित आणि पर्यावरणीय पद्धतीने स्क्रॅप करणे. आतापर्यंत देशभरात २.४५ लाख कार स्क्रॅप करण्यात आले आहे. यात सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.

स्क्रॅपिंगची संपूर्ण प्रक्रीया काय ?

रजिस्ट्रेशन आणि अपॉईंटन्मेंट : वाहन मालक Vahan वा Vscrap पोर्टलवर ऑनलाइन अपॉईंटमेंट घेऊ शकतात. अशा वाहनांना स्क्रॅपिंग सेंटर (RVSF) वर आणले जाते.येथे वाहनाची ओळख आणि वैधतेची तपासणी केली जाते. त्यानंतर तिचे, टायर, बॅटरी, काचा, इंजिन सारखे पार्ट्सना वेगळे केले जाते. त्यानंतर प्रचंड वजनाच्या मशिन्सने दाबून कारला मेटल स्क्रॅपमध्ये परिवर्तित केले जाते.

वाहनांना स्क्रॅप केल्यानंतर वाहन मालकांना Certificate of Deposit (CD) दिले जाते. ज्यातून अनेक फायदे मिळतात.

वाहन स्क्रॅप केल्याने काय फायदे मिळतात ?

नवीन वाहन घेताना टॅक्समध्ये (15-25 टक्के ) सुट मिळते. रजिस्ट्रेशन फी माफ केली जाते. स्क्रॅ व्हॅल्यू ( जुन्या गाडीची किंमतीच्या रुपात )
CD ला DigiELV पोर्टलवर विकून कमाई

टाटा, मारुती, महिंद्रा, ह्युंडई सह 12 कंपन्या CD वर डिस्काऊंट देत आहे

जे अशा गाड्यांना स्क्रॅप नाही करीत,त्यांच्यासाठी काय नियम ?

फिटनेस टेस्टची फि वाढविण्यात येते

जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनवर मोठा दंड

नियमांना डावलल्यास दंड आणि जप्ती कारवाई

प्रत्येक राज्यात ATS (Automated Testing Station) टेस्ट अनिवार्य

आतापर्यंत 8. 06 लाख कारची ऑटोमॅटेड फिटनेस टेस्टींग पूर्ण

स्क्रॅपिंगने पर्यावरण आणि उद्योगांना काय फायदा?

वायु प्रदूषणात कमतरता

स्टील आणि ऑटो उद्योगांना स्वस्तात कच्चा माल

भंगार उद्योगाला औपचारिक ओळख

रस्ता सुरक्षेत होते सुधारणा

इंधनाची बचत आणि नव्या टेक्नोलॉजीला प्रोत्साहन

स्क्रॅपिंग सेंटर आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन

आतापर्यंत 99 स्क्रॅपिंग सेंटर सुरु

55 आणखीन तयार होत आहेत

RVSF आणि ATS सुरु करण्यासाठी सोपे रजिस्ट्रेशन

सरकारी कारसाठी ई-लिलाव पोर्टल सुरु