AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय बुलेट ट्रेनच्या मार्गात चीनचा स्पीड ब्रेकर ? काय केले असे ड्र्रॅगनने

Indian Railways Bullet Train Project: बुलेट ट्रेनमधून प्रवास करण्याचा स्वप्न केव्हा साकार होणार ? लाल ड्रॅगनची बुलेट ट्रेनला आडकाटी तर नाही ना पाहा काय नेमके घडले आहे....

भारतीय बुलेट ट्रेनच्या मार्गात चीनचा स्पीड ब्रेकर ? काय केले असे ड्र्रॅगनने
| Updated on: Jun 24, 2025 | 5:14 PM
Share

Bullet Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. भारताच्या बुलेट प्रकल्पावर मोठे संकट येऊ घातलं आहे. या संकटाला आपला शेजारी चीन कारणीभूत ठरला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा महाराष्ट्रातील समुद्राखालील बोगदा लवकर तयार होणे गरजेचे असताना या कामाला अजून सुरुवातच झाली नसल्याचे उघडकीस आले आहे. या बोगदा खणण्याच्या महाकाय टनल बोअरिंग मशीन्स ( TBM) चीन एका बंदरात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे देशातील जपानच्या सहकार्याने तयार होणारा पहिलाच बुलेट प्रकल्प रखड्याची शक्यता आहे.

देशातील पहिलाच अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे बांधकाम गुजरात येथे वेगाने सुरु आहे. परंतू मुंबईतील बांधकाम आधीच रखडलेले असताना आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. या मार्गाच्या बीकेसी ते विरार दरम्यान तयार होणाऱ्या समुद्री बोगद्याचे काम करणाऱ्या महाकाय टनेल बोअरिंग मशिन्स जर्मनीची कंपनी हेरेनक्नेच्टकडून मागविल्या होत्या. या मशिनची निर्मिती चीनच्या ग्वांगझोउ फॅक्टरीत झालेली आहे.

या मशिनच्या काही भाग ऑक्टोबर 2024 पर्यंत पोहचणे अपेक्षित होते. परंतू चीनी अधिकाऱ्यांनी यास अजूनही मंजूरी दिलेली नाही. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या मशिन्सना का रोखलेले आहे याचे अधिकृत कारणही सांगण्यात आलेले नाही. या रहस्यमय विलंब आता या प्रकल्पाची डोकेदुखी बनला आहे. या प्रश्नाला राजकीय कुटनिती वापरुन सोडवण्याचा प्रयत्न होत आङे. रेल्वे मंत्रालयाने हा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयासमोर मांडला आहे. या मशिन्सला लवकर भारतात पाठविण्यासाठी चीनकडे भारताने पाठपुरावा सुरु केलेला असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. या मशिन्ससह अन्य उपयुक्त सामग्री देखील चीनी बंदरात अडकलेली आहे.

या जागी वापरल्या जाणार होत्या

नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) १.०८ लाख कोटीचा अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची उभारणी करीत आहे. यासाठी तीन टीबीएम मशिनना तैनात करण्याची योजना केलेली आहे. समुद्राखालील बोगद्याचे खोदकाम करण्यासाठी टीबीएम-1 आणि टीबीएम-2 यांना सावली ( घनसोली ) – विक्रोळी आणि वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्सच्या शिळफाटा पर्यंत 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याची निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या बोगद्याचा 7 किमीचा भाग ठाणे खाडीच्या खालून जाणार आहे. मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोडच्या बोगद्यांसाठी देखील टीबीएम मशिन चीनमधून आणण्यात आली होती. परंतू ही बाब साल 2020 च्या गलवान संघर्षाच्या आधीची आहे. आता बदललेल्या माहोलमध्ये हा विलंब अनेक सवाल निर्माण करीत आहे. हा विलंब तांत्रिक आहे की यामागे काही राजकारण असा सवाल केला जात आहे. या असे असले तरी बुलेट ट्रेनचा प्रकल्प आधी केलेल्या नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचा दावा केला जात आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.