इराणचा चॅप्टर क्लोज? जे आतापर्यंत घडलं नाही ते आता होणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे जगभरात खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धमकीमुळे आता तणाव वाढला असून, जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.

इराणचा चॅप्टर क्लोज? जे आतापर्यंत घडलं नाही ते आता होणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे जगभरात खळबळ
TRUMP
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 7:45 PM

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर प्रचंड मोठे हल्ले करण्यात येत आहेत, समोर आलेल्या माहितीनुसार इस्त्रायलने आज इराणच्या राजधानीला लक्ष्य केलं आहे. इराणच्या राजधानीमध्ये अनेक ठिकाणी हल्ला करण्यात आला. एकीकडे इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत, तर दुसरीकडे मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी बोलताना ट्रम्प यांनी म्हटलं की आता आज आम्ही इराणवर प्रचंड मोठे हल्ले करणार आहोत. तसेच त्यांनी इराण हा मध्य पूर्वेतील लुजर देश असल्याचं देखील म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर या संदर्भात पोस्ट केली आहे.

त्यांनी पुढे बोलताना असं म्हटलं आहे की, इराणच्या वाईट वागणुकीमुळे या परिसराला आणि या लोकांच्या गटाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा आणि पूर्णपणे मारण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. आतापर्यंत आम्ही ज्यांना टारगेट केलं नाही त्यांना देखील टारगेट करण्याचा विचार आम्ही करत आहोत. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी शनिवारी मोठं विधान केलं होतं. इराण कधीच अमेरिकेसमोर सरेंडर करणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी थेट इराणला धमकी दिली आहे. इराण हा मध्य पूर्वेतील लुझर देश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच इराणला इशारा देताना इराणवर आजपर्यंतचे सर्वात मोठे हल्ले आज होणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यापूर्वी काल डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक ऑफर दिली होती, त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, इराण कोणतीही अट न ठेवता सरेंडर झालं तरच त्यांच्याशी डील होऊ शकते, आम्ही इराणला जगातील एक शक्तीसाठी देश बनवू, एवढंच नाही तर आम्ही इराणसाठी एका सशक्त नेत्यांची निवड करू असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

Follow Us