
Semi-Cryogenic Engine: भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने कमाल करुन दाखवले आहे. इस्त्रोने लॉक्स केरोसीन 200T थ्रस्ट सेमीक्रायोजेनिक इंजिनाची चाचणी यशस्वी केली आहे. तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील इस्त्रोच्या प्रोपेल्शन कॉम्पलेक्समध्ये ही चाचणी करण्यात आहे. या यशामुळे भविष्यात होणाऱ्या अंतराळ मिशनसाठी अधिक शक्तीशाली आणि कुशल इंजिन बनवण्यास मदत मिळणार आहे.
इस्त्रोने 2,000 kN उच्च थ्रस्ट असणारे सेमी क्रायोजेनिक इंजिन विकसित करण्यात महत्वाची प्रगती केली आहे. हे इंजिन प्रक्षेपण यान Mark-3 (LVM-3) च्या सेमीक्रायोजेनिक बुस्टर टप्प्यासाठी मदत करणार आहे. सेमीक्रायोजेनिक इंजिन विकसित करण्याचा टप्प्यात 28 मार्च 2025 रोजी चांगले यश मिळाले. त्यावेळी पॉवर हेड टेस्ट आर्टीकलची चाचणी यशस्वी झाली होती. त्यावेळी 2.5 सेंकदसाठी ही चाचणी घेण्यात आली.
प्री-बर्नर, टर्बो पंप, स्टार्ट सिस्टीम आणि नियंत्रण घटक यासारख्या गंभीर उप-प्रणालींच्या एकात्मिक कार्यक्षमतेचे 2.5 सेकंदांच्या अल्प कालावधीत हॉट-फायरिंग करून प्रमाणीकरण करणे हा या चाचणीचा उद्देश होता. इस्त्रोने पूर्णत: एकात्मिक इंजिन बनवण्याआधी PHTA वर अनेक चाचण्या घेण्याची इस्रोची योजना आहे.
इस्त्रोचे लिक्विड प्रॉपल्शन सिस्टम्स सेंटर क्रायोजेनिक प्रॉपल्शन इंजिनाचा विकास करत आहे. स्पेस एजन्सीने 2,000 kN सेमी-क्रायोजेनिक इंजिन (SE2000) द्वारे समर्थित स्टेज (SC120) पेलोड वाढीसाठी LVM-3 च्या वर्तमान कोर लिक्विड स्टेज (L110) ची जागा घेईल आणि भविष्यातील प्रक्षेपण वाहनांच्या बूस्टर टप्प्यांना शक्ती देईल. सेमी-क्रायोजेनिक प्रोपल्शन गैर-विषारी आणि गैर-धोकादायक प्रणोदक द्रव ऑक्सिजन आणि केरोसीनचा वापर करते. विद्यमान L110 स्टेजपेक्षा चांगले कार्यप्रदर्शन करते.
ISRO achieves major breakthrough in Semicryogenic Engine development
ISRO has achieved a major breakthrough in the Semicryogenic development programme with the first successful hot test of the intermediate configuration of the 2000kN Semicryogenic engine, designated as Power…
— ISRO (@isro) March 28, 2025
इस्त्रोच्या दोन उपग्रहाचे अनोखे दृश्य अंतराळात दिसत आहे. भारताचे दोन उपग्रह एकमेकांबरोबर प्रिसिजन डान्स करताना दिसत आहे. हा स्पेस डान्स प्रत्येक 90 मिनिटात 500 किमी उंचीवर होत आहे. या ठिकाणी हे उपग्रह 28,800 किमी/तास वेगाने चक्कर मारत एक दुसऱ्यांच्या समोर येत आहे. हा प्रयोग साधारण नाही. याला इस्त्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (SpaDeX) नाव दिले आहे. त्याची सुरुवात डिसेंबर 2023 मध्ये झाली होती.