आयटी तरुणीला लग्नासाठी पाहिजे असा मुलगा, सांगितल्या 11 अटी, चौथी अट ऐकून तर डोक्याला मुंग्याच येतील

आजकाल लग्न जुळणं आणि लग्न झाल्यानंतर ते व्यवस्थित टिकणं ही फार अवघड गोष्ट झाली आहे. अलिकडच्या काळात घटस्फोटाचं प्रमाण देखील वाढलं आहे. तसेच मुलींच्या अपेक्षा वाढल्यामुळे ग्रामीण भागामध्ये लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आयटी तरुणीला लग्नासाठी पाहिजे असा मुलगा, सांगितल्या 11 अटी, चौथी अट ऐकून तर डोक्याला मुंग्याच येतील
Expectations regarding marriage
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 12, 2026 | 9:25 PM

मागील काही वर्षांमध्ये लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे, ग्रामिण भागांमध्ये तर भीषण वास्तव पहायला मिळत आहे, शेतकरी मुलांची तर लग्नच होत नसल्याने अनेक गावांमध्ये लग्नाचं वय उलटून गेलं तरी देखील विवाह न झालेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रामीण भागांमध्येच नाही तर शहरी भागांमध्ये देखील कमी -अधिक प्रमाणत अशीच स्थिती आहे. आपला होणारा पती कसा असावा? यासंदर्भाती मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे मुलांच्या देखील आपल्या होणाऱ्या पत्नीकडून अपेक्षा वाढल्यामुळे लग्नाचं वय सरासरी वाढल्याचं दिसून येत आहे. अनेकजण वयाची 30 वर्ष उलटून गेल्यानंतर लग्न करत आहेत. लग्नाआधी करिअरला प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे देखील लग्नाचं वय हे वाढलं असल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हयरल होत आहे, आपला होणारा पती कसा असावा? त्याच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? या संदर्भातील एका तरुणीची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. तीने आपल्या विवाह बायोडाटामध्ये एकून 11 अटी घातल्या आहेत. या अटी वाचून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या पोस्टवर तरुणाईकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय आहेत या अटी?  

या तरुणीने ज्या अटी घातल्या आहेत, त्यातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली अट आहे ती म्हणजे मुलाची उंची ही 6 फूट असावी, दुसरी अट आहे ती म्हणजे त्याचा पगार दर महिन्याला कमीत कमी 2 लाख इतका असावा, तिसरी अट तो नैसर्गिकरित्या सुंदर असावा, चौथी अट ऐकून तर तुम्हालाही धक्का बसेल चौथ्या अटीमध्ये या मुलीने म्हटलं आहे की, तो आपल्यासाठी 24 तास आणि आठवड्यातील आठही दिवस उपलब्ध असावा, त्याचा वेळ हा आपल्यासाठीच असावा. त्याला स्वयंपाक आला पाहिजे, त्याने सोशल मीडियाचा वापर केला नाही पाहिजे, त्याला एकही महिला मैत्रीण नसावी, त्याने कधीही ड्रीक केलं नाही पाहिजे, तसेच त्याने आपल्याला वर्षातून एक तरी फॉरेन ट्रीप घडवून आणली पाहिजे, अशा या तरुणीच्या अटी आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us