तुम्ही पाताळात लपा, तुम्हाला सोडणारच नाही; एनआयएचे एकाच वेळी 18 ठिकाणी छापे…

| Updated on: Oct 11, 2022 | 7:16 PM

जेईआयवर 'बेकायदेशीर संघटना' असल्याचे घोषित केल्यानंतरही त्या संघटनेकडून निधी उभारणीचे काम सुरुच ठेवले.

तुम्ही पाताळात लपा, तुम्हाला सोडणारच नाही; एनआयएचे एकाच वेळी 18 ठिकाणी छापे...
Follow us on

जम्मू-काश्मीर: टेरर फंडिंग (Terror Funding) प्रकरणी एनआयएकडून (NIA) जोरदार मोहीम राबवली गेली आहे. एनआयएच्या रडारवर आता जमात-ए-इस्लामीचे अनेक नेते अनेक नेते असून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. या कारवाईबद्दल बोलताना एनआयएकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, भारत सरकारने यूएपीए (UAPA)अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये जमात-ए-इस्लामीवर बंदी घालण्यात आली होती.

त्यानंतर त्यांनी अल हुदा एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रम राबवण्याचा धडाका लावण्यात आला.

त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून मंगळवारी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आतापर्यंत एकूण 18 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

यामध्ये राजौरी, पुंछ, जम्मू, श्रीनगर, बांदीपोरा, शोपियान, पुलवामा आणि बडगाम या जिल्ह्यांचा समावेश आहे.
यादरम्यान राजौरी येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद अमीर शमशी याला वेगवेगळ्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दुसरीकडे, एनआयएच्या म्हणण्यानुसार, भारत सरकारने UAPA अंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये जमात-ए-इस्लामीवर बंदी घालण्यात आली होती.

मात्र त्यानंतर अल् हुदा एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी नंतर आपला अजेंडा राबवायला सुरु केला. त्यामुळे त्या संघटनेविरोधात गुन्हा नोंद केला गेला आहे.

एनआयएकडू कारवाई करण्यात आलेला आरोपी मोहम्मद अमीर हा शमशी अल हुदा एज्युकेशनल ट्रस्टचा अध्यक्ष आहे. त्यानंतर तपास यंत्रणेने कसून चौकशी केली गेल्यानंतर अल हुदा एज्युकेशनल ट्रस्टचा मुख्य संरक्षक हा जमात-ए-इस्लामी कमीर-ए-जमात असल्याचेही तपासात उघड झाले.

जेईआयवर ‘बेकायदेशीर संघटना’ असल्याचे घोषित केल्यानंतरही त्या संघटनेकडून निधी उभारणीचे काम सुरुच ठेवले गेले होते. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये चौकशी केल्यानंतर या संघटनेवर कारवाई केली गेली आहे.

जम्मू-काश्मीर आणि येथील परिसरात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी अल हुदा एज्युकेशनल ट्रस्टवर हवालाद्वारे पैशांचा व्यवहार केल्याचा आरोप केला गेला आहे.

अल हुदा एज्युकेशनल ट्रस्टचे काही लोक जमात-ए-इस्लामी संघटनेशी संबंधित असल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे आता जमात-ए-इस्लामीचे अनेक नेते एनआयए आणि एसआयएच्या रडारवर असून 2 महिन्यांत 2 डझन नेत्यांच्या घरांवर छापे टाकले गेले आहेत.