Kashmir Encounter : काश्मीरमध्ये एकाचवेळी 3 ठिकाणी ऑपरेशन, ड्रोनचा वापर, किती दहशतवाद्यांचा गेम ओव्हर?

Kashmir Encounter : चकमकीदरम्यान जवानांनी दहशवाद्यांची स्थिती समजून घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला. यामुळे दहशतवादी कुठे लपलेत हे त्यांना समजलं. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Kashmir Encounter : काश्मीरमध्ये एकाचवेळी 3 ठिकाणी ऑपरेशन, ड्रोनचा वापर, किती दहशतवाद्यांचा गेम ओव्हर?
Kashmir Encounter
| Updated on: Aug 29, 2024 | 10:09 AM

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांनी तीन वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. सुरक्षा पथकाने कुपवाडाच्या माछिलमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तंगधार येथे एका दहशतवाद्याला संपवलं. राजौरीमध्ये एन्काऊंटर सुरु आहे. दहशतवाद्यांनी सीमा ओलांडून घुसखोरी केली होती. एन्काऊंटरनंतर त्या भागाची घेराबंदी करण्यात आली असून सर्च ऑपरेशन सुरु आहे. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ तंगधार आहे. तंगधार नेहमीच तणावाच केंद्र राहिला आहे. सुरक्षा पथकांनी दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. सुरक्षापथकांनी एका भागाला घेराव घालताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला.

राजौरीमध्ये सुरक्षापथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. जवानांनी 28 ऑगस्टला सकाळी 9.30 वाजता मोहरा लाठी गावात आणि दंथल भागात एक शोध अभियान सुरु केलं होतं. पावणेबाराच्या सुमारास दहशतवादी तिथे असल्याच समजलं. खीरी मोहरा भागात दहशतवादी आणि सैन्यामध्ये गोळीबार सुरु झाला.

अन्य टीम्स अलर्ट केलय

चकमकीदरम्यान जवानांनी दहशवाद्यांची स्थिती समजून घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला. यामुळे दहशतवादी कुठे लपलेत हे त्यांना समजलं. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरक्षापथकांनी अन्य टीम्स अलर्ट केलय. याआधी केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची बैठक केलीय. यात वाढत्या दहशतवादाला रोखण्यासंदर्भात चर्चा झाली.


जम्मू-काश्मीरमध्ये पुढच्या महिन्यात निवडणूक

जम्मू-काश्मीरमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. यात पहिला टप्पा 18 सप्टेंबरला, दुसरा टप्पा 25 सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये मतदान होईल. चार ऑक्टोबरला मतमोजणी होईल. 2014 नंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.