झारखंडमधला माणूस स्वर्गात जाऊन आला? हार्ट अटॅकनंतर जे सांगितलं त्याने सर्वच उडाले; 500 मीटरपर्यंत बस आपोआप चालली

झारखंडमधील एका बस ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानंतर बस 500 मीटर स्वतःहून चालली आणि थांबली. त्याचा जीव वाचला, पण त्याने स्वर्गासारखा अनुभव सांगितला. प्रवाशांच्या मदतीने आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे ड्रायव्हर बचावला. ही घटना चमत्कार, योगायोग किंवा काहीतरी वेगळेच आहे याबाबत चर्चा सुरू आहे.

झारखंडमधला माणूस स्वर्गात जाऊन आला? हार्ट अटॅकनंतर जे सांगितलं त्याने सर्वच उडाले; 500 मीटरपर्यंत बस आपोआप चालली
Jharkhand Bus Miracle driver heart attack
| Updated on: Feb 23, 2025 | 3:05 PM

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यानंतर तो स्वर्गात जातो, पुन्हा जिवंत होतो आणि त्याचा अनुभव लोकांना सांगतो… असे अनेक किस्से आपण वाचले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व किस्से परदेशातील आहेत. भारतात असे काही अनुभव कुणाला आले नाही. मात्र, आता भारतातील एका व्यक्तीलाही स्वर्गाचा अनुभव आल्याचं सांगितलं जातंय. घटना झारखंडची आहे. ही घटना अत्यंत वेगळी आहे. झारखंडमध्ये एका बस ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला. त्यानंतर विना ड्रायव्हरची बस 500 मीटरपर्यंत चालली आणि एका ठिकाणी जाऊन थांबली. त्यामुळे 60 लोकांचा जीव वाचला. अटॅक आल्यानंतरही ड्रायव्हरचा जीव वाचला. तो बरा झाला. पण त्यानंतर त्याने जे सांगितलं त्यामुळे सर्वच उडाले. त्याने स्वर्गासारखा अनुभव सांगितला. याला काही लोक चमत्कार म्हणत आहेत, काही योगायोग म्हणत आहेत तर काही आणखी काही. पण या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालवत असताना एका ड्रायव्हरला अचानक हार्ट अटॅक झाला. छातीत कळ येताच छातीला हात लावून बसमध्येच कोसळला. तो निपचित पडलेला होता. तरीही बस आपोआप चालत होती. विशेष म्हणजे बस व्यवस्थित चालू होती. 500 मीटरपर्यंत बस धावली आणि पुढे जाऊन थांबली. हा योगायोग होता की चमत्कार याच विचाराने सर्व प्रवासी हैराण झाले आहेत. त्यातच ड्रायव्हरने जे काही सांगितलं त्यामुळे तर सर्वच चक्रावून गेले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी 9.30 वाजताची आहे. तहले नदीला पार केल्यानंतर या ड्रायव्हरला हार्ट अटॅक आला होता.

असा वाचला ड्रायव्हरचा जीव

500 मीटर पर्यंत बस पुढे गेल्यानंतर एका जागी जाऊन थांबली. तर दुसरीकडे प्रवाश्यांनी ड्रायव्हरला गाडीमध्ये झोपवून त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. यानंतर उपचालकाने स्टिअरिंग सांभाळली. आणि बस 28 किलोमीटर दूर मेदिनीनगर रुग्णालयाकडे नेली. त्यानंतर ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. ही बस गढवा येथून रांचीला जाणार होती. ही बस चालवताना चालक वीरेंद्र पांडेय यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता.

ड्रायव्हरशिवाय चालली बस

वीरेंद्र पांडेयला हार्ट अटॅक आल्यानंतर प्रवाशांनी त्यांना तातडीने सीटवर झोपवलं. काहींनी पंपिंग, तोंडाने श्वास देण्यास आणि सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ड्रायव्हरचा जीव वाचू शकला. प्रवाशांनी वेळीच माणुसकी दाखवली आणि वीरेंद्र यांना कुटुंबात परतता आलं. एका प्रवाशाने या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. हा सर्व प्रकार एक चमत्कारच म्हणावा लागेल. बस 80 किलोमीटर वेगाने चालू होती. अचानक या बसचा वेग कमी झाला. 500 मीटर विना ड्रायव्हरची बस व्यवस्थित सुरू होती. शेवटी रस्त्याच्या एका बाजूला जाऊन बस थांबली. विशेष म्हणजे एक्सपर्ट ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला बस थांबवावी अशी ही बस थांबली होती. बस कोणीच चालवत नव्हते, तरीही बस चालली आणि थांबलीही. आमच्यासाठी हा चमत्कारच होता. ड्रायव्हरला अटॅक आल्यनंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बसमध्ये गोंधळ वाढला. त्यानंतरही बस व्यवस्थित चालू होती, असं मनीष तिवारी नावाच्या या प्रवाशाने सांगितलं.

प्रवाशी धावले

त्यानंतर, राजीव भारद्वाज, संतोष कुमार आणि कंडक्टर उपेंद्र सिंह यांनी चालक वीरेंद्र पांडेयच्या तोंडात हवा भरायला सुरूवात केली. छातीवर पंपिंग केली. त्यानंतर चालकाचा श्वासोच्छवास सुरू झाला. चालक काही वेळात सावरला. त्यानंतर उपचालक साहिलने बस हळूहळू चालवायला सुरूवात केली. अमित तिवारीच्या कारने चालकाला मेदिनीनगरमधील एका खासगी रुग्णालयात नेले. तिथे डॉ. सचिन यांनी उपचार केले. चालकाला हृदयविकाराचा झटका आला होता. प्रवाशांनी वेळेवर छातीवर पंपिंग केली, त्यामुळे जीव वाचला, असं डॉक्टरांनी सांगितलं.

अनुभव काय?

पण बरे झाल्यानंतर चालक वीरेंद्र पांडेय यांनी एक विचित्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटत आहे. बनदी ओलांडल्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर काहीतरी चमकले आणि मला चार लोक भाल्यांसह चारही बाजूने दिसले. त्यानंतर हे भाला घेतलेले लोक बस साइडला घेताना दिसले. त्यानंतर काय घडलं हे मला आठवत नाही, असं वीरेंद्र म्हणाले. आता प्रश्न उठतो की, भाल्यांनी सज्ज असलेले चार लोक यमदूत होते का देवदूत?