IT Raid: पियुष जैनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जाणून घ्या ब्लॅकमनीचे संपूर्ण सत्य

| Updated on: Dec 27, 2021 | 8:19 PM

पीयूष जैनच्या अटकेवर, निवासी परिसरातून जप्त केलेली रोकड जीएसटी न भरता वस्तूंच्या विक्रीशी संबंधित आहे, असे पीयूष जैनने कबूल केल्याचे डीजीजीआयने म्हटले आहे. ओडोकेम इंडस्ट्रीज, कन्नौज द्वारे मोठ्या प्रमाणात जीएसटी चोरी झाल्याचे सूचित केले आहे.

IT Raid: पियुष जैनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जाणून घ्या ब्लॅकमनीचे संपूर्ण सत्य
पियुष जैनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Follow us on

कानपूर : प्राप्तिकराच्या छाप्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेला कथित परफ्यूम व्यापारी पियुष जैन याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. पियुष जैन याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीयूष जैनच्या अटकेवर, निवासी परिसरातून जप्त केलेली रोकड जीएसटी न भरता वस्तूंच्या विक्रीशी संबंधित आहे, असे पीयूष जैनने कबूल केल्याचे डीजीजीआयने म्हटले आहे. ओडोकेम इंडस्ट्रीज, कन्नौज द्वारे मोठ्या प्रमाणात जीएसटी चोरी झाल्याचे सूचित केले आहे. रेकॉर्डवर उपलब्ध पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले

हजारो कोटींचा मालक असलेल्या पियुष जैनच्या घरावर प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. परफ्युम व्यावसायिक पीयूष जैन याला पोलीस कोठडीत जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले, तेथे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. तपासात कोरोनाची पुष्टी न झाल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

पियुष जैनच्या चौकशीत अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पियुष जैनने कबूल केले आहे की निवासी जागेतून जप्त केलेली रोकड जीएसटी न भरता वस्तूंच्या विक्रीशी संबंधित आहे. आयटी आणि जीएसटी विभागाद्वारे केलेल्या कारवाईमध्ये, 187 कोटी रुपयांहून अधिक बोहिशेबी रोकड हस्तगत करण्यात आली आहे. जैनकडून सीजीएसटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत अटक करण्यात आली.

मनी लॉंडिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो

ईडीचे लखनऊ युनिट घरातून वसूल केलेल्या पियुष जैन यांच्या कागदपत्रांची तपासणी करीत आहे. बँक खात्याचीही चौकशी करीत आहे. मनी ट्रोलचा शोध घेण्यात येत आहे. जीएसटीने ज्या पुराव्याच्या आधारे पियुष जैनला अटक केली आहे, त्या पुराव्यांनाही ईडी आपल्या तपासाचा हिस्सा बनवेल. जीएसटीची सीक्यूशन कंप्लेंटची कॉपीही मागेल. पियुष जैनच्या घर आणि इतर ठिकाणांवर आयकर विभागाच्या छाप्यात बेहिशेबी रोकड सापडल्यानंतर रविवारी त्याला अटक करण्यात आली. (Kanpur’s Perfume Traders Piyush Jain 14-day judicial custody)

इतर बातम्या

Crime News: भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या, जाणून घ्या नेमके काय घडले?

दरवाजा तोडून बंगल्यात घुसले, 1.5 लाख रोकड, चांदीसह 15 तोळं सोनं लुटले, दरोडेखोरांचा धुमाकूळ