दरवाजा तोडून बंगल्यात घुसले, 1.5 लाख रोकड, चांदीसह 15 तोळं सोनं लुटले, दरोडेखोरांचा धुमाकूळ

'आशा' नावाच्या बंगल्याचं दार तोडून रात्री एकूण सहा दरोडेखोर हे बंगल्यामध्ये घुसले. दरवाजा कुणीतली तोडल्याचा आवाज आल्यानं राजेंद्र गायकवाड यांना जाग आली. त्यावेळी दरोडेखोरांना पाहून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली.

दरवाजा तोडून बंगल्यात घुसले, 1.5 लाख रोकड, चांदीसह 15 तोळं सोनं लुटले, दरोडेखोरांचा धुमाकूळ
दरोडेखोरांची धुमाकूळ
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 5:52 PM

पुणे : इंदापूर तालुक्याच्या (Indapur District, Pune) पश्चिम भागात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरु आहे. अनेकजण दरोडेखोरांमुळे धास्तावले असून आता एका साखर कारखान्याच्या माजी संचालकाच्या बंगल्यावरच दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात तब्बल दीड लाख रुपयांची (1.50 Lakh) रोख रक्कम, चांदी (Silver) आणि तब्बल 15 तोळं सोनं (Gold) दरोडेखोरांनी (Robbers) लुटलं. या दरोड्यात बंगल्याच्या मालकावरही हल्ला करण्यात आला. या दरोडेखोरांना पकडण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर (Police) उभं ठाकलंय.

कुणाच्या बंगल्यावर दरोडा?

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड (Rajendra Gaikwad) यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी रात्री दरोडा टाकला. रत्नपुरीत जवळील गायकवाड वस्ती इथं राजेंद्र गायकवाड यांचा बंगला आहे. त्यांच्या ‘आशा’ नावाच्या बंगल्याचं दार तोडून रात्री एकूण सहा दरोडेखोर बंगल्यामध्ये घुसले. दरवाजा कुणीतली तोडल्याचा आवाज आल्यानं राजेंद्र गायकवाड यांना जाग आली. त्यावेळी दरोडेखोरांना पाहून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली.

राजेंद्र यांनी लाकडी काठीनं दरोडेखोरांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी धारधार शस्त्रांनी राजेंद्र गायकवाड यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. यात राजेंद्र गायकवाड हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्या कपाळाला गंभीर जखमी झाली असून त्यांना सहा टाके पडले आहे.

दरोडेखोरांनी यावेळी बंगल्यातील दीड लाख रुपये रोकड लंपास केली आहे. सोबतच बंगल्यातील तब्बल 15 तोळं सोन्यावरही हात साफ केला असून चांदीही दरोडेखोरांनी चोरली आणि बंगल्यातून पळ काढलाय. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दरोडेखोरांना पकडण्याचं आव्हान

दरम्यान, या दरोड्याबाबत कळताच पोलीस प्रशासनही सतर्क झालं आहे. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी टीम तैनात केल्या असूस दरोडेखोरांचा शोध सुरु आहे. इंदापुरातल्या पश्चिम भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

संबंधित बातम्या –

Pimpri-Chinchwad crime | हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; अग्नीशामक दलाने वाचवाला जीव

Kanpur raid Piyush Jain: अब्जोंची कॅश बाळगणारे पियुष जैन आता तुरुंगात झोपत आहेत फरशीवर

डोक्यात हातोड्याने वार, जावयाकडून राहत्या घरी सासूची हत्या

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.