राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा अहवालच काँग्रेसन दाखवला; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं मोठं ट्विट…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 136 जागा जिंकल्या असून बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्याच वेळी, 65 जागा भाजपच्या, 19 जेडीएस आणि 4 जागा इतरांच्या वाट्याला गेल्या असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितले आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा अहवालच काँग्रेसन दाखवला; काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं मोठं ट्विट...
| Updated on: May 14, 2023 | 12:41 AM

नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दणदणीत विजयानंतर पक्षाने आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’चा परिणाम सांगितला आहे. भारत जोडो यात्रेचे रिपोर्ट कार्डच आता काँग्रेसने जाहीर केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पदयात्रेदरम्यान आलेल्या 20 विधानसभा मतदारसंघांमधील पक्षाच्या कामगिरीचे तुलनात्मक विश्लेषण केले आहे. या पदयात्रेच्या निमित्ताने या निवडणुकीचे निवडणुकीचे ठोकताळे निश्चित केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

कर्नाटकातील भारत जोडो यात्रेचाच हा थेट परिणाम असल्याचे जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे. भारत जोडो यात्रेविषयी बोलायचे झाल्यास पक्षाला एकसंध बनवण्यात आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यात आणि त्यांना घडवण्यात या यात्रेने मोठी भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जनतेशी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे. त्याआधारेच त्यांच्या पक्षाने चर्चा करून जाहीरनाम्यातील हमी आणि आश्वासने अंतिम केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

जयराम रमेश यांनी ट्विट करत विश्लेषणाचा एक तक्ताही शेअर केला आहे, त्यामध्ये म्हटले आहे की, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 20 पैकी केवळ 5 जागा काँग्रेसच्या खात्यात जमा झाल्या होत्या.

 

पण यावेळी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्याजागी 15 जागा जिंकल्या आहेत तर भाजपला दोन आणि जेडीएसला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये दाखल झाली होती. कर्नाटकातील चामराजनगर, म्हैसूर, मंड्या, तुमकूर, चित्रदुर्ग, बेल्लारी आणि रायचूर मार्गे सुमारे 22 दिवसांत याने 500 किमी पेक्षा जास्त अंतर कापले होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 136 जागा जिंकल्या असून बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्याच वेळी, 65 जागा भाजपच्या, 19 जेडीएस आणि 4 जागा इतरांच्या वाट्याला गेल्या असल्याचेही जयराम रमेश यांनी सांगितले आहे.