कन्नड बोलो मॅडम, यह कर्नाटक है… SBI मॅनेजर आणि ग्राहकामध्ये भाषेवरून जोरदार शाब्दिक चकमक; Video व्हायरल

कर्नाटकातील एका बँकेत कन्नड भाषेवरून वाद निर्माण झाला आहे. बँकेच्या मॅनेजरने ग्राहकासोबत कन्नडमध्ये बोलण्यास नकार दिला, ज्यामुळे वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे कन्नड भाषेच्या आदराबाबत चर्चा रंगली असून, काही कन्नड कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. घटनेवर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

कन्नड बोलो मॅडम, यह कर्नाटक है... SBI मॅनेजर आणि ग्राहकामध्ये भाषेवरून जोरदार शाब्दिक चकमक; Video व्हायरल
SBI मॅनेजर आणि ग्राहकामध्ये भाषेवरून जोरदार शाब्दिक चकमक
| Updated on: May 21, 2025 | 9:04 PM

कन्नड बोलो मॅडम, यह कर्नाटक है… SBI मॅनेजर आणि ग्राहकामध्ये भाषेवरून जोरदार शाब्दिक चकमक; Video व्हायरल
महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यास सक्तीचं केल्याने त्याचे देशभर पडसाद उमटतात. मराठी लोक भाषेसाठी दादागिरी करत असल्याची आवई उठवली जाते. पण आता कर्नाटकातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला थेट बँकच्या महिला मॅनेजरलाच कन्नडमध्ये बोलण्यास सांगितलं. मॅडम, हे कर्नाटक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याशी कन्नडमध्येच संवाद साधा असं ग्राहकाने महिलेला सुनावलं. भाषेवरून दोघांमध्ये बरीच वादावादी झाली. या वादावादीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बाहेरील लोक स्थानिक भाषेचा कसा अवमान करतात, हेच या व्हिडीओतून समोर आलं आहे.

कर्नाटकाची राजधानी बंगळुरूच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेतील हा व्हिडिओ आहे. बँकेच्या महिला मॅनेजरने कस्टमर सोबत कन्नडमध्ये बोलण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. दक्षिण बंगळुरूच्या चंदपुरा येथे ही घटना घडली. एक महिला बँकेत आली होती. ही महिला बँक मॅनेजर महिलेशी कन्नडमध्ये बोलत होती. पण मॅनेजर महिलेने हिंदीत बोलण्यास सुरूवात केली आणि ग्राहक महिलेलाही हिंदीत बोलण्यास सांगितलं. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.

हा भारत आहे, फक्त हिंदी बोलणार

या व्हिडीओतील संवाद स्पष्टपणे ऐकू येतोय. कस्टमर महिलाने मॅनेजर महिलेला बरंच सुनावल्याचं दिसत आहे. हे कर्नाटक आहे. त्यामुळे तुम्हाला कन्नड बोललं पाहिजे, असं ही कस्टमर महिला म्हणाली. कन्नडमध्ये बोला मॅडम. हे कर्नाटक आहे, असं कस्टमर महिला बोलताना दिसते. तर त्यावर तर? हा भारत आहे. मी फक्त हिंदीतच बोलेल, असं महिला मॅनेजर बोलताना दिसत आहे.

त्यानंतर कस्टमर महिलेने मॅनेजर महिलेला आरबीआयच्या गाईडलाईनच दाखवल्या. त्यात ग्राहकांशी स्थानिक भाषेतच संवाद साधण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. महिलेने ही गाईडलाईन दाखवताच मॅनेजर महिलेने कोणतंच उत्तर दिलं नाही. मात्र, तिने उलट उत्तर दिलं. तू काही मला नोकरी दिली नाही, असं महिला मॅनेजर म्हणताच कस्टमर महिला भडकली. दोघींमध्ये बराच वाद झाला. मी कन्नडमध्ये बोलणारच नाही, असा तगादाच मॅनेजरने लावला. त्यावर सुपर, मॅडम, सुपर, असं म्हणत ग्राहक महिलेने टोला लगावला.

 

संमिश्र प्रतिक्रिया

या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ आल्यानंतर लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. नेटिजन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणीही कुणावर स्थानिक भाषा थोपवू शकत नाही. लोक आपल्या इच्छेनुसार भाषा बोलतात, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर कन्नडमध्ये बोलण्यास ज्या पद्धतीने नकार दिला, ते मॅनेजरचं असभ्यपणाचं लक्षण होतं, असं काहींनी म्हटलं आहे. काहींनी मात्र, आपण ज्या राज्यात राहतो, तिथल्या भाषेचा सन्मान केलाच पाहिजे. तिथली भाषा शिकली पाहिजे आणि त्या भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी एक्स्ट्रा भाषा शिकलं तर बिघडलं कुठं? असा सवाल केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कन्नड कार्यकर्त्यांच्या एका गटाने बँकेच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या मेन शाखेपर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्याचा निर्णयही या गटाने घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात कन्नडमध्येही भाषिक वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.