काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याला ईडीचे पुन्हा समन्स; म्हणाले, ही तर भाजपची जाणीवपूर्वक अडवणूक

| Updated on: Sep 15, 2022 | 5:53 PM

ईडीने डीके शिवकुमार यांना पुन्हा समन्स बजावले, म्हणाले- माझ्या राजकीय कर्तव्याच्या आड येत आहेत समन्स शिवकुमार म्हणाले की ते एजन्सीला सहकार्य करण्यास तयार आहेत, परंतु समन्सची वेळ त्यांच्या घटनात्मक आणि राजकीय कर्तव्याच्या मार्गात येत आहे.

काँग्रेसच्या या दिग्गज नेत्याला ईडीचे पुन्हा समन्स; म्हणाले, ही तर भाजपची जाणीवपूर्वक अडवणूक
Follow us on

बंगळरूः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा कर्नाटकात अजून आली नाही. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसच्या कर्नाटक काँग्रेसचे (Karnatka Congress) अध्यक्ष डीके शिवकुमारांना (DK Shivkumar) पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की त्यांची चौकशी करण्यासाठी ईडीकडून त्यांनी गुरुवारी समन्स देण्यात आले आहे.

ईडीने समन्स दिल्यानंतर मात्र शिवकुमार यांनी सांगितले की, ते ईडीला सहकार्य करणार आहेच मात्र आमच्या राजकीय वाटचालीत भाजपकडून अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही केली गेली आहे.

भारत जोडो यात्रा कर्नाटकात

काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून डीके शिवकुमार यांची ओळख आहे. कर्नाटक काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्षपदाची त्यांच्याकडे जबाबदारीही आहे. त्यामुळे त्यांना बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसची भारत जोडो यात्रा कर्नाटकात येण्याआधीच ईडीकडून ही मला समन्स दिली गेली आहे.

अधिवेशन सुरु असतानाच नोटीस

कर्नाटकात एकीकडे आमच्या पक्षाची भारत जोडो यात्रा आलेली असताना आणि दुसरीकडे विधानसभेचे अधिवेशन सुरु असतानाच मला ईडीकडून समन्स दिले गेले आहे. याबद्दल त्यांनी ट्विटरवरुनही याबाबत आपल्या भावना शेअर केल्या आहेत.

ट्विटवर त्यांनी ईडीला आपण सहकार्य करणार असून भाजपकडून मात्र आम्हाला त्रास देण्यासाठी अशा कारवाया केल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनांमुळे माझ्या राजकीय वाटचालीत मला अडथळे येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

’40 टक्के सरकार, भाजप म्हणजे भ्रष्टाचार’

कर्नाटकातील राजकीय परिस्थिती विषयी सांगताना ते म्हणाले की, आम्ही कर्नाटकातील भाजप सरकारविरोधा आवाज उठविला आहे. त्यामध्ये 40 % सरकार, भाजपा का मतलब भ्रष्टाचार अशी मोहिम आम्ही राबवली आहे.

त्यामुळेच भाजपकडून ही कारवाई केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हे म्हणाले होते की,मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचाराच्या कारवाईत गुंतले आहेत. त्यामुळे शिवकुमार यांनी ‘40% कमिशन सरकार’ यावर एक गाणंही रिलीज केले गेले आहे.

डीके 50 दिवस तुरुंगात

डीके शिवकुमार यांच्याविरोधात ईडीने सप्टेंबर 2018 मध्ये शिवकुमार आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

यापूर्वी आयकर विभागाने करचोरी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणीही बंगळुरू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्याचाच आधार घेत ईडीकडून गुन्हा दाखल केला होता, मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना 2019 मध्ये 50 दिवस तुरुंगात राहावे लागले होते, तर त्यानंतर मात्र त्यांना जामीन मिळाला होता.