झुरळ आणि उंदराची विष्ठा सापडल्यानंतर KFC आणि डोमिनोजचे आऊटलेट बंद

तेलंगाना सरकारच्या खाद्य सुरक्षा विभाग TG SAFE ने हैदराबादमध्ये अस्वच्छता आणि खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन KFC आणि Dominos चे अनेक आऊटलेट्सचे FSSAI लायसन्स निलंबित केली आहेत.

झुरळ आणि उंदराची विष्ठा सापडल्यानंतर  KFC आणि डोमिनोजचे आऊटलेट बंद
kfc and dominos
| Updated on: Nov 13, 2026 | 8:05 PM

खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात तेलंगणा राज्य सरकारच्या विशेष खाद्य सुरक्षा विभाग ‘TG SAFE’ ने हैदराबादमध्ये KFC आणि डोमिनोजचे अनेक आऊटलेट्सचे FSSAI लायसन्स निलंबित केली आहेत. तपासणी दरम्यान या आऊटलेटमध्ये स्वच्छतेची स्थिती खूपच खराब असल्याचे आढळले. यात झुरळांचा आणि उंदरांचा वावर आणि त्यांची विष्ठा आढळली असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

या छाप्यात डझनावारी फास्ट-फूड आऊटलेट आणि रेस्तरांचा समावेश होता, त्यामुळे अनेक प्रमुख शाखांना तातडीने बंद करण्यात आले आहे. या कारवाईतून कॉर्पोरेट नफ्यासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळता येणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

Loading...

ज्या KFC आऊटलेट्सचे लायसन्स निलंबित केले आहेत. त्यात मियापुर, चारमिनार, बंजारा हिल्स, सिंधी कॉलनी, मूसा रामबाग, शिल्पा कला वेदिका आणि इनऑर्बिट मॉलच्या शाखांचा समावेश आहे. तसेच सरथ सिटी मॉल आणि इनऑर्बिट मॉलमधील डोमिनोजच्या शाखांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

या वेळी छाप्यात अधिकाऱ्यांना मुदत संपलेले खाद्य पदार्थ, अस्वच्छ किचन आणि जेवण शिजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाला स्वच्छ करण्यासाठी रसायनांचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळले. एका मोठ्या कारवाईत अधिकाऱ्यांनी 52 किलोग्रॅम सिंथेटिक मॅग्नीशियम सिलिकेट जप्त केले आहे. या पदार्थाचा वापर जेवण बनवताना करण्यास मनाई आहे. तसेच लॅब टेस्टींगसाठी खाद्यपदार्थांचे अनेक नमुने घेतले आहेत.

 

एका अन्य कार्रवाईत ‘बिरयानी बाय किलो’, ‘कुलचा कल्चर’ आणि ‘ITC आशीर्वाद सोल क्रिएशन्स’ सारख्या अनेक अन्य प्रमुख रेस्तरांच्या लायसन्स देखील खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने निलंबित केले आहेत. या आऊटलेट्सना लागलीच त्यांचे काम बंद करण्यास सागंण्यात आले आहे. स्विगी (Swiggy) आणि झोमॅटो (Zomato) सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सना या निलंबित शाखांना जोपर्यंत त्यांची लायसन्स पुन्हा मिळत नाहीत तोपर्यंत आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यास सांगितले आहे.

पुढील कारवाई

अधिकारी अनेक आस्थापनांना सुधारणा सूचना आणि इतरांना कारणे दाखवा नोटीस बजावतील. त्यानंतर दंडासारखी पुढील कारवाई केली जाईल. अन्न सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि आपल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला जबाबदार धरण्याच्या तेलंगणा सरकारच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

या धाडींमुळे लोकप्रिय फास्ट-फूड चेनच्या चकचकीत दर्शनी भागामागील कठोर वास्तव उघड केले आहे. तसेच, ब्रँड कितीही मोठा किंवा प्रतिष्ठित असला तरी, नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा हा एक स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us