Kisan Credit Card | आता तीन कागदपत्रांद्वारे मिळणार शेतकरी क्रेडिट कार्ड; कार्डावर मिळणार ‘इतकं’ कर्ज

| Updated on: Dec 19, 2020 | 11:17 AM

याआधी शेतकरी क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोसिंग फीस, इंस्पेक्शन आणि लेझर फोलिया द्यावा लागत होता.

Kisan Credit Card | आता तीन कागदपत्रांद्वारे मिळणार शेतकरी क्रेडिट कार्ड; कार्डावर मिळणार इतकं कर्ज
PM Kisan Samman scheme
Follow us on

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रायसेनमध्ये शुक्रवारी झालेल्या शेतकरी महासम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितलं की पूर्वी शेतकरी क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) सर्वांना नाही मिळायचं. मात्र, त्यांच्या सरकारने नियमांमध्ये बदल करत हे शक्य करुन दाखवलं आहे. सरकारने कोरोनाच्या काळात शेतकरी क्रेडिट कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. फक्त तीन कागदपत्रांच्या माध्यमातून शेतकरी क्रेडिट कार्ड बनवता येणार आहे. यासाठी बँक पीएम शेतकरी सन्मान निधीचा डेटाही वापरणार आहे. अर्जाच्या अवघ्ये 15 दिवसांच्या आत केसीसी जारी केला जाईल (Kisan Credit Card).

याआधी शेतकरी क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोसिंग फीस, इंस्पेक्शन आणि लेझर फोलिया द्यावा लागत होता. सरकारने आता हे सर्व रद्द केलं आहे. यामध्ये तीन लाखांचं कर्ज मिळतं. आधी गॅरंटीविना 1 लाख रुपयांचं लोक मिळायचं आता ते वाढवून 1.60 लाख रुपयांपर्यंत वाढवलं आहे.

शेतकरी क्रेडिट कार्ड कोण बनवू शकतं?

>> शेतीशी जोडलेली कोणतीही व्यक्ती, जरी तो आपल्या शेतात शेती करत असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल, तो केसीसी बनवू शकतो.

>> कर्जाची मुदत संपेपर्यंत केसीसीसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 75 वर्षे असणे आवश्यक आहे.

>> 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. हा अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असू शकतो. सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

KCC साठी महत्त्वाचे कागदपत्र

>> वेगवेगळ्या बँका केसीसीसाठी अर्जदाराकडे वेगवेगळी कागदपत्रे मागतात, परंतु काही मूलभूत कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.

>> यामध्ये आयडी प्रुफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफसाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असावेत. (Kisan Credit Card)

>> याशिवाय अर्जासाठी अर्जदाराचा पासपोर्ट फोटोदेखील आवश्यक आहे.

शेतकरी क्रेडिट कार्डवरील व्याज दर

शेतकरी क्रेडिट कार्डवरील व्याज दर वार्षिक 7 टक्के आहे. एका वर्षाच्या आत कर्जाची परतफेड केल्यास व्याजदरावर 3 टक्के सूट मिळते. या व्यतिरिक्त 2 टक्के सब्सिडी मिळते. अशा प्रकारे शेतकऱ्यांना व्याज दरावर 5 टक्के सूट मिळते.

Kisan Credit Card

संबंधित बातम्या :

कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ दिवशी 2000 रुपये जमा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘या’ पोर्टलवर अर्ज करा, 31 डिसेंबर शेवटची तारीख

कांद्याचे भाव पडणार, शेतकऱ्यांचं वाटोळं? मध्यमवर्गीयांचं बरं होणार?