
कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातील (Kolkata Doctor Case) आरोपीची सीबीआयकडून सायकोलॉजिकल टेस्ट केली जातेय. सीबीआयसारख्या एजन्सीकडून फार क्वचित सायकोलॉजिकल टेस्टचा आधार घेतला जातो. ही टेस्ट करण्यामागचा उद्देश केवळ आरोपीची मानसिक स्थिती जाणून घेणं नसून तो कोणत्या कारणामुळे इतका विकृतपणे वागला, कोणत्या गोष्टींनी त्याला प्रवृत्त केलं, यादेखील प्रश्नांची उत्तरं मिळवणं आहे. 9 ऑगस्ट रोजी कोलकातामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. सायकोलॉजिकल टेस्ट कशासाठी? सीबीआयकडून केल्या जाणाऱ्या या सायकोलॉजिकल टेस्टमध्ये (Psychological test) आरोपीच्या चारित्र्याचं मूल्यमापन केलं जातंय. नंतर ही माहिती न्यायालयात सादर केली जाऊ शकते. या टेस्टमुळे गुन्हेगारांची मानसिकता समजण्यास मदत होते आणि परिणामी भविष्यात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे रोखण्यास मदत होऊ शकते. कोलकाता प्रकरणातील पीडित डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक माहिती...