
आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही… आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही… एका पुरुषासोबत असंच झालं आहे. एक 36 वर्षांचा पुरुष उठतो आणि रोजप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात. पत्नी म्हणते, घरात अन्न आणि पाणी पूर्णपणे संपलं आहे…. काही तरी आणी ज्यामुळे जेवण बनवता येईल… यावर पती म्हणतो, “तुला माहिती आहे गेल्या आठवड्यापासून माझ्याकडे कोणतंही काम नाही. माझ्या खिशात एक पैसा नाही.”
यावर पत्नी म्हणाते, “एक काम करा सीएसपी सेंटरमध्ये जा आणि तुमचं अकाउंट तपासा. त्यात काही पैसे असतील. ते काढा आणि रेशन घ्या.” पत्नीने सांगितल्यानंतर पती बँकेत जातो आणि बँक कर्मचाऱ्याने खात्यात किती पैसे आहेत, हे पाहण्यासाठी सांगतो आणि म्हणतो, 500 असतील तर, 200 द्या आणि 400 असतील तर 200 द्या… कर्मचाऱ्याने पाहिलं आणि सांगितलं…600 कोटी आहेत… यावर बँक कर्मचारी देखील थक्क झाला आणि पुरुष देखील हैराण झाला…
संबंधित घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील राजपूर या गावात घडली आहे आणि पुरुषाचं नाव जितेंद्र साह असं आहे… खात्यात 600 कोटी आहेत हे कळल्यानंतर जितेंद्र बँक कर्मचाऱ्याला म्हणाला, ‘साहेब 200 रुपये तरी द्या..’ यावर सीएसपी सेंटरचा कर्मचारी म्हणाला, ” जर मी तुला एक रुपयाही दिला तर माझी नोकरी जाईल. तुझ्यावर कारवाई होऊ शकते. आम्हाला याबद्दल पोलिसांना कळवावं लागेल.” त्यानंतर पुढच्या 20 मिनिटांत त्याचं खातं फ्रिझ केलं जातं…
बँक मॅनेजर आणि पोलिसांनी याला तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे आणि ते तपास करत आहेत. गुन्हा उघडकीस येईपर्यंत त्यांना त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन पोलिसांनी कुटुंबाला दिले आहे. जितेंद्र म्हणाला, ‘गेल्या आठवड्यापासून माझ्याकडे कोणतंही काम नाही. मी पैसे काढू शकलो नाही. पैशाची आधीच समस्या आहे, पण आता मला खटला भरण्याची चिंता आहे. पोलिसांनी मला ताब्यात घेतलं तर, मला माहिती देखील नाही की, एवढी मोठी रक्कम आली कशी…’ मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.