
लडाखच्या गलवानमधील चारबाग भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सैन्याच्या एका वाहनावर दगड कोसळला. यात वाहनाच नुकसान झालय. सोबत दोन अधिकारी शहीद झाले. तीन अधिकारी गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना एअरलिफ्ट करण्यात आलय. जखमींमध्ये 2 मेजर आणि एक कॅप्टन आहे. जवानांचा ताफा दुरबुकपासून चोंगटासच्या ट्रेनिंग प्रवासावर होते. बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. दुरबुकवरुन चोंगताशला जाणाऱ्या सैन्य वाहनाला भूस्खलनाचा सामना करावा लागला. यात 14 सिंध हॉर्सचे लेफ्टनेंट कर्नल मनकोटिया, दलजीत सिंह शहीद झाले. मेजर मयंक शुभम (14 सिंध हॉर्स), मेजर अमित दीक्षित आणि कॅप्टन गौरव (60 आर्म्ड) जखमी झाले.
जखमी जवानांना 153 GH लेह येथे नेण्यात आलं आहे. या दुर्घटनेबद्दल भारतीय सैन्याच्या फायर एंड फ्यूरी कॉर्प्सने माहिती दिलीय. 30 जुलै रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास लडाख येथे सैन्याच्या वाहनावर पर्वतावरुन आलेला मोठा दगड कोसळला. बचाव कार्य सुरु आहे.
रामबनमध्ये झालेला अपघात
अलीकडच्या महिन्यात सैन्य वाहनासोबत झालेली ही मोठी दुर्घटना आहे. त्याआधी याचवर्षी मे महिन्यात जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात सैन्याच्या एका वाहनाचा अपघात झाला होता. बॅटरी चश्माजवळ हा अपघात झालेला. सैन्याचा एक ट्रक 200-300 मीटर खोल दरीत कोसळलेला. यात अपघातात तीन जवान शहीद झालेले. हा सैन्य ट्रक जम्मूवरुन श्रीनगरला चाललेला.
ROAD ACCIDENT
A boulder from a cliff fell on one of the vehicles of a military convoy in Ladakh, around 1130h on 30 Jul 2025.
Recovery action is in progress. @adgpi@NorthernComd_IA— @firefurycorps_IA (@firefurycorps) July 30, 2025
या कारणामुळे अपघात
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुर्घटना नॅशनल हायवे 44 वर सकाळी 11.30 वाजता झाली. सैन्याचा ट्रक श्रीनगरला जाणाऱ्या ताफ्याचा भाग होता. हा अपघात इतका भयानक होता की, ट्रक लोखंडाच्या ढिगाऱ्यामध्ये बदलला. वाहनाच संतुलन बिघडल्यामुळे हा भीषण अपघात झालेला.