काँग्रेसमुळे इंडिया आघाडीतून बाहेर पडला, आता हा 22 खासदारांचा पक्ष देणार डिलिमेटेशन बिलाला पाठिंबा? मताचं गणित जुळलं

केंद्रातील भाजप सरकारकडून 30 डिसेंबरपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. याच अधिवेशेनात डिलिमिटेशन बिल सादर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

काँग्रेसमुळे इंडिया आघाडीतून बाहेर पडला, आता हा 22 खासदारांचा पक्ष देणार डिलिमेटेशन बिलाला पाठिंबा? मताचं गणित जुळलं
डीएमके डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 27, 2026 | 8:04 AM

मोठी बातमी समोर येत आहे, केंद्रातील भाजप सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे.  30 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरपर्यंत लोकसभेचं अधिवेशन चालणार आहे. तर 2 आणि 3 डिसेंबरला राज्यसभेचं अधिवेशन होणार आहे. याच अधिवेशनामध्ये सरकारकडून डिलिमिटेशन बिल सादर केलं जाण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन बिल पास होण्यासाठी सरकारला दोन तृतीयांश मतांची गरज आहे. या आधीही केंद्र सरकारकडून संसदेत डिलिमिटेशन बिल सादर करण्यात आलं होतं. परंतु ते तेव्हा मंजूर होऊ शकलं नव्हतं. मात्र आता हे बिल मंजूर होण्यासाठी लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे तामिळनाडूमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेला डीएमके या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. डीएमकेकडे सध्या स्थितीमध्ये 22 खासदार आहेत. त्यामुळे डीएमके काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  प्रत्येक राज्यात 50 टक्के जागा वाढवल्या तर डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचा विचार करू असं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता डीएमके देखील या बिलाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. यावरून काँग्रेसने डीएमकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. डीएमके गद्दार असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

Loading...

दरम्यान डीएमके देखील इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष होता. परंतु यावर्षी झालेल्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने जी भूमिका घेतली, त्यामुळे नाराज होत डीएमकेनं तडकाफडकी इंडिया आघाडीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये थलपती विजय यांचा पक्ष असलेला टिव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु तरी देखील त्यांना पूर्ण बहुमत नव्हतं, त्यानंतर थलपती विजय यांनी काँग्रेससोबत युती करून तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन केलं.

यावरून डीएमके चांगलाच नाराज झाला. काँग्रेसने आमचा विश्वासघात केल्याचं म्हणत इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली. दरम्यान आता याच गोष्टीचा बदला घेण्याची संधी डिएमकेकडे असणार आहे. त्यामुळे डीएमके या बिलाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. स्टॅलिन यांनी तसे संकेत देखील दिले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us