
कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा आज ( ९ डिसेंबर ) जन्म दिवस आहे. सोनिया गांधी ७८ वर्षांच्या झाल्या आहेत. आता त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. गेल्या तीन दशकांपासून त्या कॉंग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा जन्म इटलीत झाला आणि लंडनच्या क्रेंब्रिज युनिव्हर्सिटीत त्यांचे शिक्षण झाले. तेथेच त्यांची भेट राजीव गांधी यांच्याशी झाली होती.दोघांत मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झाले. त्यांची लव्ह स्टोरी कमी रंजक नाही. सोनियांच्या पालकांना तिने भारतात जाऊन राजीव यांच्याशी लग्न करणे अजिबात पसंत नव्हते… सोनिया ७ जानेवारी १९६५ रोजी केंब्रिज विद्यापीठात अभ्यासासाठी आल्या. लंडनमधील हा परिसर शिक्षणासाठी परदेशातून येणाऱ्या सुरक्षित आणि पॉश विभाग आहे.त्यांनी दोन मुख्य लॅंग्वेज स्कूल पैकी एकात प्रवेश घतला आहे. तेथे विद्यापीठाने त्यांच्या रहाण्याची व्यवस्था केली. तेथील जेवण त्यांना पसंद नव्हते. तसेच इंग्रजी बोलताना त्यांना अडचण होती. तेथील कॅंपसमध्ये ग्रीक रेस्टॉरंटमध्ये इटालियन फूड मिळत होते. वर्सिटी...