
LPG and Petrol price : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारताच्या एनर्जी पुरवठ्यावर दिसू लागला आहे. तेल, LPG आणि LNG सारखे ऊर्जा स्त्रोत भारताच्या वेगाने वाढत्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात. त्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. भारताची LPG ची गरज आहे, त्याच्या 60 टक्के आणि LNG ची अर्ध्यापेक्षा जास्त मागणी आयातीच्या माध्यमातून पूर्ण होते. यातला मोठा भाग आखाती देशातून येतो. अशा स्थितीत देशाच्या अनेक भागात LPG चा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. आज 11 मार्च आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात पेट्रोल-डिझेल आणि LPG ची काय किंमत आहे? ते जाणून घ्या.
जियो-पॉलिटिकल टेंशन दरम्यान 7 मार्च रोजी देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढवण्यात आली. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलो बिगर सबसिडीवाल्या घरगुती सिलिंडरची किंमत 913 रुपये झाली. तेच 19 किलो कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 114-115 रुपयांनी वाढून दिल्लीत 1,883 रुपये झाली.
LPG गॅस दर
| शहर | LPG (14.2 KG) | कमर्शिअल LPG (19 KG) |
|---|---|---|
| मुंबई | ₹912.50 | ₹1,836.00 |
| नवी दिल्ली | ₹913.00 | ₹1,988.50 |
| चेन्नई | ₹928.50 | ₹2,043.50 |
| कोलकत्ता | ₹939.00 | ₹1,988.50 |
| बंगळुरु | ₹915.50 | ₹1,958.00 |
सरकारचे निर्देश काय?
पश्चिम आशियात तणाव आहे. त्यामुळे LPG पुरवठा प्रभावित होऊ शकतो. ही बाब ध्यानात घेऊन सरकारने हे पाऊल उचललय. गॅसची कमतरता भासू नये यासाठी सरकराने एस्मा कायदा लावला आहे. रिफायनरी कंपन्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्दश दिले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरला प्राथमिकता देण्यास सांगितलं आहे. सरकारने काही सेक्टर्सना 100 टक्के गॅस सप्लाय सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
पेट्रोल-डिझेल दर
| शहर | पेट्रोल (₹/लीटर) | डीजल (₹/लीटर) |
|---|---|---|
| मुंबई | ₹104.21 | ₹92.15 |
| नाशिक | ₹95.50 | ₹89.50 |
| पुणे | ₹104.04 | ₹90.57 |
| नवी दिल्ली | ₹94.72 | ₹87.62 |
| अहमदाबाद | ₹94.49 | ₹90.17 |
बुकिंगचे नियमही कठोर केले
त्या शिवाय गॅस सिलिंडरच्या बुकिंगचे नियमही कठोर केले आहेत. घरगुती LPG सिलेंडर घेतल्यानंतर आता पुढची बुकिंग 25 दिवसानंतरच तुम्ही करु शकता. सिलिंडरची साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.