LPG ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! 16 ऑगस्टपर्यंत एक अट पूर्ण करा, अन्यथा मिळणार नाही सिलिंडर

एलपीजी ग्राहकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. ई-केवायसी करण्यासाठी 16 ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे.

LPG ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! 16 ऑगस्टपर्यंत एक अट पूर्ण करा, अन्यथा मिळणार नाही सिलिंडर
lpg gas e-kyc
| Updated on: Aug 15, 2026 | 2:57 PM

एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर धारकांची ई-केवायसीची मुदत अत्यंत जवळ आली आहे. आता एलपीजी सिलिंडर प्राप्त करण्यासाठी ई-केवायसी करणे सक्तीचं करण्यात आलं आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2026 ही आहे. या तारखेनंतर एलपीजी गॅस कनेक्शनसाठी ई-केवायसी केली नाही, तर गॅस सिलिंडर मिळणार नाही. त्याचबरोबर एलपीजी सिलिंडरवर मिळणार सबसिडीचे लाभ देखील मिळणार नाही.

गॅस कनेक्शनसाठी ई-केवायसी करणे सर्व जुन्या ग्राहकांना अनिवार्य आहे. ज्या ग्राहकांनी ई-केवायसी केलं आहे. त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही. खरंतर ज्या जुन्या ग्राहकांनी ई-केवायसी केली नाही, त्यांचासाठी अत्यंत गरजेची सूचना आहे. तसेच ई-केवायसी इंडेन, भारत गॅस आणि एचपी या तीन कंपन्यांच्या ग्राहकांसाठी आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थींसाठी देखील केवायसी करणे गरजेचे आहे.

कुठे करायचं ई-केवायसी?

एलपीजी ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने ई-केवायसी करू शकता. ऑफलाइन ई-केवायसी करण्यासाठी गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. या ऑफिसमध्ये जाताना आधार, पॅन, फोटो देणे अनिवार्य ठरणार आहे. या व्यतिरिक्त मोबाइल अॅपच्या मदतीने ई-केवायसी मिनिटांत करता येणार आहे. ऑनलाइन ई-केवायसी करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेची असणार आहे.

…तर मिळणार नाही गॅस सिलिंडर

कोणत्याही ग्राहाकांना ऑनलाइन ई-केवायसी करताना समस्या येत असेल. त्यांनी गॅस एजन्सीच्या ऑफिसशी संपर्क साधणे फायदेशीर ठरेल. डेडलाइनमुळे एलपीजी ग्राहकांना लवकरच प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ठराविक ग्राहकांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही. त्यांना पंतप्रधान उज्ज्वल्ला योजनेअंतर्गत येणाऱ्या सबसिडी योजनेचाही लाभ मिळणार नाही.

घाबरण्याची आवश्यकता नाही

तुम्ही दिलेल्या डेडलाइनमध्ये ई-केवायसी केली नाही. तर घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही 16 तारखेनंतर ई-केवायसी करू शकता. परंतु ही बाब लक्षात घ्यावी लागेल की, ई-केवायसी केल्याशिवाय गॅस सिलिंडर मिळणार नाही. याचा अर्थ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच गॅस सिलिंडर मिळणे सुरू होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us