Lunar Eclipse 2020 India: वर्षातील तिसऱ्या चंद्रग्रहणाचा योग, कधी-कोठे दिसणार?

या वर्षातील तिसरं चंद्रग्रहण आज (5 जुलै) रोजी दिसणार आहे. सकाळी 8.38 ते 11.21 या काळात हे ग्रहण दिसले. (Lunar eclipse 2020 India)

Lunar Eclipse 2020 India: वर्षातील तिसऱ्या चंद्रग्रहणाचा योग, कधी-कोठे दिसणार?

नवी दिल्ली : या वर्षातील तिसरं चंद्रग्रहण आज (5 जुलै) रोजी दिसणार आहे. सकाळी 8 वाजून 38 मिनिटांनी सुरु होणारं हे ग्रहण 11 वाजून 21 मिनिटांपर्यंत दिसले त्यानंतर संपेल. (Lunar eclipse 2020 India) हे उपछाया प्रकारचं ग्रहण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणाचा परिणाम अगदी नगन्य आहे. असं असलं तरी ज्योतिषशास्त्रात या ग्रहणामुळे काही वाईट परिणाम होऊ शकतो अशी मान्यता आहे. त्यामुळे या काळात खबरदारी घेण्यास सांगितलं जातं.

उपछाया चंद्र ग्रहण म्हणजे ग्रहण सुरु होण्याआधी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो. याला चंद्र मालिन्य म्हणतात. यानंतर चंद्र पृथ्वीच्या वास्तवातील सावलीत प्रवेश करतो. यावेळी खऱ्या अर्थाने ग्रहण सुरु होते. अनेकदा चंद्र पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश करतो आणि उपछायेतूनच निघून जातो. पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेशच करत नाही. त्यामुळेच उपछाया ग्रहणावेळी चंद्राची प्रतिमा केवळ अंधूक होते, पूर्ण काळी होत नाही. या अस्पष्टपणाला सामान्य स्थितीत पाहता येत नाही. म्हणूनच या ग्रहणाला उपछाया चंद्रग्रहण म्हटले जाते.

चंद्रग्रहण कोठे कोठे दिसणार?

आज (5 जुलै) हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोप या देशांमध्ये दिसले. भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही. म्हणूनच त्याचा सूतक काळ मान्य केला जाणार नाही. या काळात सर्वप्रकारचे शुभ काम केले जाऊ शकतात.

उपछाया चंद्रग्रहण आणि या प्रकारच्या इतर खगोलशास्त्रीय घटना नेहमी स्लोह (Slooh) आणि व्हर्च्युअल टेलीस्कोप वेबसाईटसह अनेक लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. जर तुम्ही ग्रहण दिसणाऱ्या ठिकाणांपैकी एकावर राहत असाल तर तुम्ही हे चंद्रग्रहण पाहू शकणार आहात. यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची आवश्यकता नसेल. हे ग्रहण जवळपास 2 तास 43 मिनिटं आणि 24 सेकंदांपर्यंत पाहता येईल. या काळात सुर्य उगवत असल्याने भारतात हे ग्रहण दिसणार नाही.

हेही वाचा :

पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू

Pune Police | पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून एका दिवसात 1 हजार 16 कारवाया

Maharashtra Corona Update | दिवसभरात 7,074 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या पा

Lunar Eclipse 2020 India Time and place to see lunar eclipse