Maharashtra Corona Update | दिवसभरात 7,074 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या पार

आज दिवसभरात राज्यात तब्बल 7 हजार 074 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 64 वर पोहोचली आहे

Maharashtra Corona Update | दिवसभरात 7,074 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या पार

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस (Maharashtra Corona Total Cases) वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 7 हजार 074 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 64 वर पोहोचली आहे (Maharashtra Corona Total Cases).

दिवसभरात 3,395 रुग्ण कोरोनामुक्त

आज दिवसभरात 3 हजार 395 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 08 हजार 082 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.02 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

दिवसभरात 295 कोरोना रुग्णांचा मृत्यू

दिवसभरात 295 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 124 मृत्यू मागील 48 तासांमधील आहेत. तर उर्वरित 171 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.33 टक्के इतका आहे.

राज्यात 5,96,038 जण क्वारंटाईनमध्ये 

राज्यात सध्या 64 शासकीय आणि 50 खासगी अशा एकूण 114 प्रयोगशाळा कोव्हिड-19 च्या चाचणीसाठी सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 96 हजार 038 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 41 हजार 566 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कोरोना संबंधितीची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई123382965866499
पुणे (शहर+ग्रामीण)113004699302728
ठाणे (शहर+ग्रामीण)104935810953008
पालघर 1840812179424
रायगड2014315658510
रत्नागिरी2119140578
सिंधुदुर्ग4893469
सातारा56793482172
सांगली46871986124
नाशिक (शहर +ग्रामीण)2059712621569
अहमदनगर (शहर+ग्रामीण)9111492897
धुळे40632541127
जळगाव 144389767611
नंदूरबार 92351543
सोलापूर117126841580
कोल्हापूर 88853347218
औरंगाबाद1629810660545
जालना2460161886
हिंगोली 78654617
परभणी102846039
लातूर 36381535146
उस्मानाबाद 224985862
बीड167155531
नांदेड 30811083107
अकोला 29812447129
अमरावती 2809193082
यवतमाळ 146696044
बुलडाणा 1900109052
वाशिम 93056118
नागपूर85852756230
वर्धा 2801779
भंडारा3722432
गोंदिया 5443144
चंद्रपूर7353821
गडचिरोली4203082
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)524054
एकूण51533235171017757

राज्यातील अनेक महापालिकांनी त्यांच्या हद्दीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी आणि प्रसाराची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कुठे-कुठे लॉकडाऊन?

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत कडक निर्बंध

ठाणे, कल्याण-डोंबिवली आजपासून पुढील दहा दिवस कडक निर्बंध असतील. आज (2 जुलै) सकाळी 7 वाजता सुरु झालेला लॉकडाऊन रविवार 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

पनवेल, नवी मुंबईतही लॉकडाऊन

इतर शहरांपाठोपाठ पनवेल, नवी मुंबईतही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 4 जुलै ते 13 जुलैपर्यंत नवी मुंबई आणि पनवेलमध्ये लॉकडाउन असणार आहे.

Maharashtra Corona Total Cases

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा लॉकडाऊन

मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या जवळपास 15 लाख आहे. शहरात रुग्णसंखेत वाढ होत असल्याने मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन 1 जुलै ते 10 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 10 दिवस असणार आहे. यादरम्यान औषधांची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद असणार आहेत.

अहमदनगरमध्ये राहाता तालुक्यात लॉकडाऊन

कोरोनाची वाढती संख्या पाहाता अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दाढ, रुई आणि कोल्हार या गावांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

बीडमध्ये आजपासून 7 दिवस कडकडीत बंद

बीड जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच काल आणखी एक कोरोना रुग्ण नकळतपणे अनेक नागरिकांच्या संपर्कात आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून (2 जुलै) 7 दिवस बीड शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

मलकापूर, नांदुरा, मोताळ्यात 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन

बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 253 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मलकापूर उपविभागात 116 कोरोना रुग्ण आहेत. तर मलकापूर तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याधिकारी यांनी मलकापूर तालुका लॉकडाऊन करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. तर आता नांदुरा आणि मोताळा तालुक्यात सुद्धा 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

अकोटमध्ये 3 ते 9 जुलैपर्यंत ‘जनता कर्फ्यू’

अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 3 जुलै ते 9 जुलै दरम्यान शहरात जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. नागरिकांनी स्वतःहून यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

भिवंडीत 18 जूनपासून लॉकडाऊन

भिवंडी महानगरपालिकेने 18 जूनपासूनच 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनला सुरुवातीच्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच शेवटच्या 7 दिवसात परिस्थितीत शिथिलता आली. त्यानंतर शहरात बहुसंख्य ठिकाणी काही दुकाने उघडली, तर काही दुकाने बंद असल्याचे पहायला मिळाले.

सिंधुदुर्गात 2 जुलै ते 8 जुलै लॉकडाऊन

2 जुलै ते 8 जुलै या कालावधीत सिंधुदुर्गात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुगणांची संख्या वाढू लागल्याने 7 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यालयं वगळता सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.

रत्नागिरीत ‘ब्रेक द चेन पॅटर्न’खाली पुन्हा लॉकडाऊन

रत्नागिरी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन पॅटर्न’खाली कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनचा आजचा दुसरा दिवस आहे. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळला जात आहे.

अक्कलकोटमध्ये ‘जनता कर्फ्यू’

अक्कलकोट शहरात येत्या 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पुकारण्याचा निर्णय अक्कलकोट शहरातील नागरिकांनी घेतला आहे.

चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी शहरात 3 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात 3 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

Maharashtra Corona Total Cases

संबंधित बातम्या :

नागपूरच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता, कारागृहातही कोरोनाचा कहर, एका दिवसात 42 कैदी पॉझिटिव्ह

वसई-विरार क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 220 रुग्ण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *