वसई-विरार क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 220 रुग्ण

वसई विरार नालासोपारात क्षेत्रात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patient increase Vasai Virar) आहे.

वसई-विरार क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 220 रुग्ण

वसई : वसई विरार नालासोपारात क्षेत्रात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patient increase Vasai Virar) आहे. येथे कोरोना रुग्ण संख्येने 4800 चा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासात 220 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ तर 202 जणांनी कोरोनावर मात केली आहे. नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 122 पुरुष तर 98 महिलांचा समावेश आहे. नवे 220 रुग्ण पकडून वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 4837 वर पोहोचली (Corona Patient increase Vasai Virar) आहे.

वसई विरार क्षेत्रात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या 124 झाली असून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 2381 झाली आहे. उर्वरित 2456 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

वसई विरार नालासोपा-यात कोव्हिड 19 चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या 32 हजार 126 आहे. 14 दिवसांचा क्वारनटाईन कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 5 हजार 624 एवढी आहे. तर आत्तापर्यंत देखरेखीखाली असलेल्या नागरिकांची संख्या 18 हजार 376 आहे.

वसई विरार महापालिका हद्दीत वाढत्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर महापालिका आयुक्त गंगाथरण डी यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक सुविधायुक्त भव्य विलगिकरण कक्ष सज्ज करण्यात आला आहे.

वसई पूर्व वालिव विभागातील वरून इंडस्ट्रीजमध्ये विलगिकरण कक्ष उभारला आहे. 2 मजल्याच्या इंडस्ट्रीजमध्ये तळमजल्यावर 650 बेड, पहिल्या मजल्यावर 350 बेड अशा 1000 बेडचे विलगिकरण कक्ष आहे. यामध्ये 150 बेड ऑक्सिजन रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. 1000 रुग्णांसाठी 100 टॉयलेट बाथरून, गरम पाण्याची सुविधा, प्रत्येक बेडजवळ फॅन, सामान ठेवण्यासाठी छोटे कपाट, डॉक्टर कक्ष या सुविधाही करण्यात आल्या आहेत. तसेच अलगिकरण कक्षासोबत 4 नव्या रुग्णवाहिका, कॉन्टेन्मेंट झोनसाठी प्रत्येक प्रभागाला 1 अशा 9 पिकअप जीप नव्याने घेण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

नागपूर मध्यवर्ती कारागृहाला कोरोनाचा विळखा, कैदी, कर्मचारी, अधिकाऱ्यांसह 96 जण बाधित

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *