नागपूर मध्यवर्ती कारागृहाला कोरोनाचा विळखा, कैदी, कर्मचारी, अधिकाऱ्यांसह 96 जण बाधित

नागपूर मध्यवर्ती कारागृहाला कोरोनाचा विळखा, कैदी, कर्मचारी, अधिकाऱ्यांसह 96 जण बाधित

गेल्या तीन महिन्यांपासून करोनाच्या संसर्गापासून अलिप्त राहिलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातही आता कोरोनाने प्रवेश केला आहे.

Nupur Chilkulwar

|

Jul 03, 2020 | 7:20 PM

नागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून करोनाच्या संसर्गापासून (Nagpur Central Jail Corona Infection) अलिप्त राहिलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातही आता कोरोनाने प्रवेश केला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह 10 कारागृह कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यात वाढ व्हायला सुरुवात झाली आणि आता जेलमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 96 वर पोहचला आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे (Nagpur Central Jail Corona Infection).

तुरुंगात कोरोनाचा प्रवेश होऊ नये, म्हणून नागपूर मध्यवर्ती तुरुंग लॉकडाऊन करण्यात आलं होतं. याशिवाय, नवे नियम तयार करुन ते राबवण्यात आले. या नव्या नियमानुसार, नव्या कैद्यांना 14 दिवस तुरुंगाबाहेर तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात ठेवण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. सोबतच बंदोबस्तासाठी तुरुंगात कर्मचारी आणि अधिकारी यांना दोन आठवडे तुरुंगाच्या आत राहण्याचे निर्देश देण्यात आले.

या धोरणानुसार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक बॅच 26 जूनला तुरुंगातून बाहेर आली. तुरुंगाच्या आत असलेल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना सदृश लक्षणे दिसू लागली होती. बंदोबस्त आटोपून बाहेर आलेल्या या कर्मचाऱ्याने घरीच उपचार केले. परंतु, आराम नसल्याने अखेर त्याने शासकीय मेडिकल रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 30 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 9 कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यात एका अधिकाऱ्याचाही समावेश होता (Nagpur Central Jail Corona Infection).

त्यानंतर दुसऱ्या दिवशी 44 पॉझिटिव्ह आले आणि आज 30 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. असे 96 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यात कैदी, कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नातेवाईक यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तुरुंगातील कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने आता या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चाचणी करण्यात येणार आहे. तुरुंगाच्या आत असताना कोरोनाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग कसा झाला याचे कोडे तुरुंग प्रशासनाला पडले आहे. शिवाय, आता तुरुंगातील इतर कर्मचारी आणि कैद्यांना कोरोनाच्या संसर्गापासून रोखण्याचे आव्हान तुरुंग प्रशासनासोबतच आरोग्य यंत्रनेपुढे आहे (Nagpur Central Jail Corona Infection).

संबंधित बातम्या :

आयुक्त-महापौर वाद शमेना, तुकाराम मुंढेंनी कंत्राटदाराला 18 कोटी कसे दिले? नागपूरच्या महापौरांचा सवाल

Lockdown Extended | ठाणे, नवी मुंबई, बीड, राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें