Lockdown Extended | ठाणे, नवी मुंबई, बीड, राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन?

अनलॉकनंतर ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नवी मुंबई, ठाणे, बीड महापालिकांनी पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

Lockdown Extended | ठाणे, नवी मुंबई, बीड, राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊन?

मुंबई : राज्यात अनलॉक-2 ची घोषणा झाली. मात्र, राज्यात (Lockdown Extended In Maharashtra Districts) अनलॉक होताच त्याचा विपरित परिणामही दिसू लागला आहे. अनलॉकनंतर ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नवी मुंबई, ठाणे, बीड महापालिकांनी पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर, मुंबईतही नाईट कर्फ्यू आणखी कडक करण्यात आला आहे (Lockdown Extended In Maharashtra Districts).

राज्यातील अनेक महापालिकांनी त्यांच्या हद्दीत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी आणि प्रसाराची साखळी तोडण्यासाठी हा निर्ण. घेण्यात आला आहे.

राज्यात कुठे-कुठे लॉकडाऊन?

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत कडक निर्बंध

ठाणे, कल्याण-डोंबिवली आजपासून पुढील दहा दिवस कडक निर्बंध असतील. आज (2 जुलै) सकाळी 7 वाजता सुरु झालेला लॉकडाऊन रविवार 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

पनवेल, नवी मुंबईतही लॉकडाऊन

इतर शहरांपाठोपाठ पनवेल, नवी मुंबईतही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. 4 जुलै ते 13 जुलैपर्यंत नवी मुंबई आणि पनवेलमध्ये लॉकडाउन असणार आहे.

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा लॉकडाऊन

मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या जवळपास 15 लाख आहे. शहरात रुग्णसंखेत वाढ होत असल्याने मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन 1 जुलै ते 10 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 10 दिवस असणार आहे. यादरम्यान औषधांची दुकानं वगळता इतर सर्व दुकानं बंद असणार आहेत.

अहमदनगरमध्ये राहाता तालुक्यात लॉकडाऊन

कोरोनाची वाढती संख्या पाहाता अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दाढ, रुई आणि कोल्हार या गावांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

बीडमध्ये आजपासून 7 दिवस कडकडीत बंद

बीड जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच काल आणखी एक कोरोना रुग्ण नकळतपणे अनेक नागरिकांच्या संपर्कात आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून (2 जुलै) 7 दिवस बीड शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत (Lockdown Extended In Maharashtra Districts).

मलकापूर, नांदुरा, मोताळ्यात 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन

बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 253 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मलकापूर उपविभागात 116 कोरोना रुग्ण आहेत. तर मलकापूर तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याधिकारी यांनी मलकापूर तालुका लॉकडाऊन करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. तर आता नांदुरा आणि मोताळा तालुक्यात सुद्धा 15 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

अकोटमध्ये 3 ते 9 जुलैपर्यंत ‘जनता कर्फ्यू’

अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात कोरोनाचं संक्रमण वाढत आहे. त्यामुळे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 3 जुलै ते 9 जुलै दरम्यान शहरात जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. नागरिकांनी स्वतःहून यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

भिवंडीत 18 जूनपासून लॉकडाऊन

भिवंडी महानगरपालिकेने 18 जूनपासूनच 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनला सुरुवातीच्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळत असतानाच शेवटच्या 7 दिवसात परिस्थितीत शिथिलता आली. त्यानंतर शहरात बहुसंख्य ठिकाणी काही दुकाने उघडली, तर काही दुकाने बंद असल्याचे पहायला मिळाले.

सिंधुदुर्गात 2 जुलै ते 8 जुलै लॉकडाऊन

2 जुलै ते 8 जुलै या कालावधीत सिंधुदुर्गात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुगणांची संख्या वाढू लागल्याने 7 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. यादरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कार्यालयं वगळता सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दहा टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.

रत्नागिरीत ‘ब्रेक द चेन पॅटर्न’खाली पुन्हा लॉकडाऊन

रत्नागिरी जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन पॅटर्न’खाली कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनचा आजचा दुसरा दिवस आहे. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळला जात आहे.

अक्कलकोटमध्ये ‘जनता कर्फ्यू’

अक्कलकोट शहरात येत्या 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पुकारण्याचा निर्णय अक्कलकोट शहरातील नागरिकांनी घेतला आहे.

चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी शहरात 3 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात 3 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

सोलापूर आणि औरंगाबादेतही लॉकडाऊनची मागणी

सोलापूर शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसचे, वाढत्या मृत्यूदराला कमी करण्याचं आव्हानही प्रशासनासमोर कायम आहे. दिवसागणिक वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांची संख्या पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊनसाठी महानगर पालिका विचाराधिन आहे. तर, लॉकडाऊनमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतपत संख्या असणाऱ्या भागात आता कोरोनाने हाथ पाय पसरले आहे.

औरंगाबाद शहरातही झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातही लोकडाऊन करण्यात यावं, अशी मागणी सध्या समोर येऊ लागली आहे. मात्र, या मागणीबाबत प्रशासनाने अजूनही थेट उत्तर दिलेलं नाही. पण तरीही परिस्थिती बिघडली, तर औरंगाबाद शहर पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Lockdown Extended In Maharashtra Districts

संबंधित बातम्या :

Akola Janta Curfew | अकोटमध्ये 3 ते 9 जुलैपर्यंत ‘जनता कर्फ्यू’, नागरिकांनी सहकार्य करावं, बच्चू कडू यांचं आवाहन

लॉकडाऊनआधी ठाणेकरांची भाजी खरेदीसाठी झुंबड, दामदुपटीविषयी नाराजी

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *