AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Lockdown | लॉकडाऊनआधी ठाणेकरांची भाजी खरेदीसाठी झुंबड, दामदुपटीविषयी नाराजी

2 जुलै रोजी सकाळी 7 ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

Thane Lockdown | लॉकडाऊनआधी ठाणेकरांची भाजी खरेदीसाठी झुंबड, दामदुपटीविषयी नाराजी
| Updated on: Jul 01, 2020 | 12:17 PM
Share

ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महापालिकेच्या वतीने पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु ठाणेकरांनी भाजी खरेदीसाठी झुंबड केल्याने उद्देश सफल होणार का, याविषयी आधीच शंका उपस्थित झाली आहे. (Thane Citizens Crowd at Vegetable Market before Lockdown)

ठाण्यात उद्यापासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याची कमतरता भासू नये, यासाठी ठाण्यातील जांभळी नाक्यावर असलेल्या मुख्य बाजारपेठेत भाजी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली.

भाज्यांचे भाव दुप्पट झाल्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र ज्या भागातून भाजी येते, तिथे सतत पडणारा पाऊस आणि हमाल मिळत नसल्यामुळे भाज्यांचे दर वाढल्याचे विक्रेते सांगत आहेत.

लॉकडाऊनसाठी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. 2 जुलै रोजी सकाळी 7 ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत काय सुरु, काय बंद?

1) नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.

2) इंटरसिटी, एसटी बसेस किंवा मेट्रोसारख्या कोणत्याही सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही

3) टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. जीवनाश्यक वस्तू, आरोग्य सेवा अंतर्गत येणाऱ्या प्रवासास ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशाला खाजगी वाहनांमध्ये परवानगी

4) सर्व आंतरराज्य बस आणि प्रवासी वाहतूक सेवा (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटर यांचे कामकाज बंद असेल. तर ठाण्याबाहेरुन येऊन ठाणे जिल्ह्यामार्गे बाहेर जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.

5) ज्या व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे, त्यांनी आदेशाचे सक्त पालन केले पाहिजे. अन्यथा ती व्यक्ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.

6) सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेल्या कामासाठी बाहेर यावे

7) सार्वजनिक ठिकाणी आकर्षक बाबीच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.

8) व्यावसायिक आस्थापना कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकानांनी त्यांचे कामकाज बंद ठेवावे.

9) सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटीकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल .

10) डाळ व तांदूळ गिरणी खाद्य आणि संबंधित उद्योग, दुग्धशाळा खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांत गुंतलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल.

11) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांचा ऑपरेट करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची

12) आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या दुकाने, आस्थापनावरील प्रतिबंध बँक, एटीएम, विमा आणि संबंधित बाबी, आयटी आणि आयपीएस टेलिकॉम, टपाल, इंटरनेट आणि डेटा सेवांना वगळण्यात आले आहे. (Thane Citizens Crowd at Vegetable Market before Lockdown)

संबंधित बातमी :

‘अनलॉक’चा दुसरा टप्पा सुरु, कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम, कुठे काय सुरु काय बंद?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.