मोठी खळबळ! रिक्षातूनच… अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार यांच्या घराची आरोपींनी..
टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात आता मोठी माहिती पुढे येत आहे. एका मागून एक अपडेट या प्रकरणात येत असून आता नवी माहिती पुढे आली.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी करण्यासाठी थेट रिक्षाचालकाची मदत घेण्यात आली. तिन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कोटा पोलिसांनी ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. आता आरोपींकडून धक्कादायक खुलासे केले जात आहेत. आरोपींना कमी सुरक्षा असलेल्या सेलिब्रिटीला लक्ष्य करण्याचे शूटर्सना निर्देश असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. सुरूवातीला त्यांचे टार्गेट, अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमार आणि आमिर खान होते. पण त्यांची सुरक्षा पाहून आरोपींनी आपल्या प्लान बदलला आणि आपल्या मोर्चा टायगर श्रॉफ याच्याकडे वळवला. आम्हाला अभिनेत्यांची घर पाहायची आहेत आणि फोटो काढायचे आहेत असे सांगत रिक्षाचालकांच्या मदतीने मिळाला मोठमोठ्या अभिनेत्यांच्या घरचा पत्ता.
आरोपी रिक्षाचालकांच्या मदतीने वांद्रे परिसरात फिरले आणि या अभिनेत्यांच्या घरांची रेकी केली. त्यानंतर आरोपींनी तिथे असलेल्या सुरक्षेला सहज भेदणे शक्य नसल्याने त्याची माहिती अनिल पंडितला दिली. त्यासंदर्भातले काही फोटो व्हिडिओही आरोपींनी अनिल पंडितला पाठवल्याची माहिती मिळतंय. त्यानंतर आरोपींनी आपला मोर्चा टायगरकडे वळवला ज्यात तो दर शनिवारी रविवारी फुटबॉल खेळायला जात असल्याची माहिती मिळाली.
शिवाय बाकी अभिनेत्यांकडे प्रचंड सुरक्षा असते, तेवढी सुरक्षा टायगर श्रॉफकडे नसल्याचे आरोपींच्या लक्षात आले. त्यानंतर आरोपी 11 ऑक्टोबरला जुहूच्या मैदानावर गेले. मात्र, टायगर श्रॉफ न आल्याने ते 18 ऑक्टोबरला पुन्हा शस्त्रांसह पोहोचले. याच कालावधीत हरियाणातील आणखी काही जण मुंबईत येऊन रेकी करून परत गेल्याची माहिती मिळतंय.
गोळीबारासाठी एक विदेशी आणि एक देशी पिस्तूल वापरल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळतंय. गोळीबारानंतर मुंबईतून बाहेर पडताना दोन्ही पिस्तुले अज्ञात ठिकाणी फेकल्याची माहिती मिळत आहे. शस्त्रांचा शोध घेण्याचे मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या प्रकरणात एका मागून एक धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे. त्यातच रिक्षाच्या मदतीने त्यांनी अभिनेत्यांच्या घराची रेकी केल्याची माहिती मिळतंय.
