पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात काल (4 जुलै) रेकॉर्ड ब्रेक 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला (Corona Patient death Pune) आहे.

पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यात काल (4 जुलै) रेकॉर्ड ब्रेक 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला (Corona Patient death Pune) आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1168 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 311 बाधित रुग्ण आढळले (Corona Patient death Pune) आहेत.

पुणे पालिका हद्दीत दिवसभरात 819 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात आतापर्यंत 20, 668 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यासोबत काल दिवसभरात 18 बाधित रुग्णांचा मृत्यू तर आतापर्यंत 703 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात दिवसभरात 399 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात 12689 रुग्ण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टिव रुग्ण 7276 असून क्रिटिकल 385 आणि 56 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

दरम्यान, राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 64 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत एकूण 1 लाख 08 हजार 082 रुग्ण बरे झाले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | दिवसभरात 7,074 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांच्या पार

Pune Police | पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून एका दिवसात 1 हजार 16 कारवाया

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *