Pune Police | पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून एका दिवसात 1 हजार 16 कारवाया

पुणे शहरात 94 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या कारवाईसाठी 85 अधिकारी आणि 337 कर्मचारी तैनात करण्यात आले.

Pune Police | पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून एका दिवसात 1 हजार 16 कारवाया

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे (Pune Police Action On Violation Of Rules). लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर प्रतिबंधित आणि इतर ठिकाणी सातत्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासनाला उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, पोलिसांनी शुक्रवारी (4 जुलै) ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन कारवाई केली. शहरात वेगवेगळ्या तब्बल 1 हजार 16 कारवाया केल्या. तसेच, विना मास्क फिरणाऱ्या 102 जणांवर कारवाई करण्यात आली आहे (Pune Police Action On Violation Of Rules).

संचारबंदीचा कालावधी रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत आहे. या कालावधीत नियमांच उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी पुणे शहरात 94 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या कारवाईसाठी 85 अधिकारी आणि 337 कर्मचारी तैनात करण्यात आले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

विनापरवानगी संचार करणाऱ्या 69 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. तर विना मास्क मोकाट फिरणाऱ्या 102 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रात्री ते पहाटे संचार बंदीच्या काळात 97 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

तर, 188 अंतर्गत 184 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. 108 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 131 जणांवर कारवाई केली. सिग्नल जम्पिंग 110, रॉन्गसाईड 57, फुटपाथवर गाड्या चालवणे 31 जणांवर कारवाई केली. तर बेदरकार गाडी चालवणाऱ्या 57 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Pune Police Action On Violation Of Rules

संबंधित बातम्या :

पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन

पुण्यात कोरोनामुक्तीचा जल्लोष अंगलट, डीजे लावून नाचणाऱ्या 16 जणांवर गुन्हे दाखल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *