AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींना नियमांचा अर्थ कळत नाही, त्यामुळे ते काहीही बोलतात – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

Rahul Gandhi vs Pralhad Joshi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज आज मुद्द्यांवर भाष्य करत सरकार गंभीर ओरोप केले आहेत. या आरोपांवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधींना नियमांचा अर्थ कळत नाही, त्यामुळे ते काहीही बोलतात -  केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
Pralhad JoshiImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 11, 2026 | 4:56 PM
Share

संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज आज मुद्द्यांवर भाष्य करत सरकार गंभीर ओरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की ‘न्याय विभागाकडे एपस्टाईन फाइल्सवरील फाइल्स आहेत, ज्यामध्ये मंत्री हरदीप पुरी आणि अनिल अंबानी यांची नावे आहेत. अदानी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात समन्स जारी करण्यात आले आहेत. मात्र गेल्या 18 महिन्यांपासून भारत सरकारने याला प्रतिसाद दिलेला नाही. याचा अर्थ पंतप्रधानांवर थेट दबाव आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

राहुल गांधींना नियमांचा अर्थ कळत नाही – प्रल्हाद जोशी

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींच्या भाषणावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, ‘जर कोणताही आरोप केला गेला तर तो संबंधित कागदपत्रांसह त्याचे पुरावे दिले पाहिजेत. त्यांना नियम किंवा ऑथंटिकेशनचा अर्थ कळत नाही. म्हणूनच ते काहीही बोलत राहतात. काँग्रेसला इतिहासाचे ज्ञान नाही. त्यांनी अर्थसंकल्पाबद्दल काहीही सांगितले नाही. जेव्हा एखादा सदस्य अध्यक्षपदावर बसतो तेव्हा तो कोणत्याही पक्षाचा नसतो. तो पूर्वी त्यांच्या पक्षात होता असे सांगून अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान करून ते विरोधी पक्षनेत्याच्या पदाला कमी लेखत आहेत. फक्त राजकीय फायद्यासाठी, त्यांनी अर्थसंकल्प वगळता सर्व गोष्टींवर भाष्य केले.’

राहुल गांधींविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव

लोकसभेतील भाषणात राहुल गांधींनी सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल आणि निराधार विधाने केल्याबद्दल आम्ही राहुल गांधींविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव मांडणार आहोत. लोकसभा आणि राज्यसभेचे कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियम अतिशय स्पष्ट आहेत. जेव्हा एखादा सदस्य दुसऱ्या सदस्यावर गंभीर आरोप करू इच्छितो तेव्हा त्यांनी सूचना देऊन ठोस प्रस्ताव मांडला पाहिजे. सभागृहात, मी राहुल गांधींना त्यांच्या बोलण्याबद्दल आवश्यक कागदपत्रे देण्याची विनंती केली.”

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?