AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक; शाळा,महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये बंद राहतील की सुरू?

Bharat Bandh on 12th February: 12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशभारतील कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी ही बंदची हाक दिली आहे. त्याचा परिणाम दिसून येईल. काय बंद असेल आणि कोणत्या सेवा असतील सुरू?

12 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक; शाळा,महाविद्यालय आणि सरकारी कार्यालये बंद राहतील की सुरू?
भारत बंदची हाकImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Feb 11, 2026 | 3:41 PM
Share

Bharat Bandh 12 Feb 2026: 12 फेब्रुवारी रोजी देशातील अनेक संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. बँक कर्मचारी संगटनांपासून ते शेतकरी संगटनांपर्यंत गुरुवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका व्यापारी करार, मनरेगाचा बदल, BV-GRG सारख्या मुद्यांवर देशातील कर्मचारी संघटना, शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या बंदमुळे बँका, सरकारी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक क्षेत्र आणि बाजारावर मोठा परिणाम दिसू शकतो. या देशव्यापी संपामुळे काही राज्यात मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. काही ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय बंद असू शकतात.

देशव्यापी बंदचे कारण काय?

भारत बंदमध्ये 10 केंद्रीय ट्रेड युनियनचा समावेश आहे. यामध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांचा समावेश आहे. हा संप नवीन लेबर कोड आणि भारत-अमेरिकेतली व्यापारी कराराविरोधात आहे. या नवीन बदलांमुळे देशाच्या कामगार वर्ग, अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या नवीन धोरणांचा या संघटनांनी विरोध केला आहे.

या चार नवीन कामगार कायद्यांमुळे कर्मचारी, कामगारांचे अधिकार हिरावल्या जात असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. या कायद्यांमुळे नोकरीची सुरक्षा राहणार नाही. कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळेल. तर खासगीकरण, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा या मुद्दांवर पण कर्मचारी आणि कामगार नाराज आहेत.

कर्मचारी संघटनांच्या मुख्य मागण्या काय?

चारही कामगार कायदे रद्द करा. प्रस्तावित सीड बिल, विद्युत संशोधन बिल आणि SHANTI कायदा मागे घेण्याची मोठी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. तर मनरेगा पुन्हा मजबूत करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘विकसित भारत-रोजगार आणि उपजीविका हमी योजना (ग्रामीण) अधिनियम 2025’ रद्द करण्याची मागणी कर्मचारी, कामगार संघटनांनी केली आहे.

काय काय बंद असेल, काय असेल सुरू?

देशभरातली शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची अधिकृत आदेश नाहीत. केरळ, कर्नाटक आणि ओडिसा राज्यात या बंदचा प्रभावी परिणाम दिसू शकतो. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही शाळा, महाविद्यालये बंद असू शकतात. 12 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज प्रभावित होईल. बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. अर्थात बँकांनी अथवा रिझर्व्ह बँकेने या दिवशी सुट्टीची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण काही बँकांतील कामकाजावर त्याचा थेट परिणाम दिसून येईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...