AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंडित असल्याचं सांगून संबंध ठेवले, नंतर म्हणाला तू धर्मच बदल….

महिला गर्भवती झाल्यानंतर मात्र तिच्यावर मुस्लिम होण्यासाठी दबाव आणण्यात येऊ लागला.

पंडित असल्याचं सांगून संबंध ठेवले, नंतर म्हणाला तू धर्मच बदल....
| Updated on: Oct 27, 2022 | 8:01 PM
Share

भोपाळः आधी मैत्री, नंतर प्रेम आणि त्यानंतर लग्नाच्या आणाभाका देऊन मुलीबरोबर शारीरिक संबंध ठेवले होते. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर मुलीने जेव्हा लग्नाचा तगादा लावला त्यावेळी मात्र तिला धर्मांतराची धमकी देण्यात आली. हा प्रकार घडला आहे मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये.  यामुळे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर पंडित असल्याचे सांगत आरोपीने तरुणीशी मैत्री केली होती. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तो तिच्याशी संबंध ठेवत होता.

महिला गर्भवती झाल्यानंतर मात्र तिच्यावर मुस्लिम होण्यासाठी दबाव आणण्यात येऊ लागला. संबंधित आरोपी हा 14 वर्षांपूर्वी महिलेच्या संपर्कात आला होता.

त्याने त्या महिलेला ब्राह्मण असल्याचे खोटं सांगून त्याने महिलेला बळजबरीने घेऊन गेला होता.

त्यानंतरही त्याने महिलेबरोबर संबंध ठेवले होते. त्यानंतर महिला गरोदर राहिला असल्यामुळे त्या दोघांनी 7 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेजही केले होते.

ज्यावेळी मुलीने कोर्ट मॅरेजच्या करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी हा तरुण मुस्लिम असल्याचे समजले. तरीही मुलीने त्याच्या बरोबर लग्न केले.

लग्नानंतर मात्र आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. लहानपणी ती त्याचा छळ सहन करत राहिली. तर आता लग्नाच्या 8 वर्षानंतर मात्र पती तिच्यावर हिंदू धर्मातून मुस्लिम हो म्हणून तो दबाव आणत आहे.

पतीच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने शुक्रवारी आपल्या 8 वर्षाच्या मुलासह शुजालपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पीडितेसोबत हिंदू जागरण मंचचे कार्यकर्तेही उपस्थित होते. पोलिसांनी आरोपी पती शेख जाहिद शुजालपूर याच्याविरुद्ध बलात्कार आणि धर्मांतर कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी भोपाळची रहिवासी आहे. माझे पहिले लग्न माझ्याच सोसायटीत घरच्यांच्या इच्छेने झाले होते.

मात्र कौटुंबिक वादामुळे ते लग्न मोडले होते. माझा खर्च भागवण्यासाठी आणि कुटुंब चालवण्यासाठी मी एअरटेल कंपनीत रुजू झाले होते. भोपाळजवळच्या करौंडमध्ये राहणाऱ्या माझ्या नातेवाईकांना सुट्टीच्या दिवशी भेटायला जात होते.

त्यावेळी तिची शुजालपूर येथील शेख जाहिद उर्फ ​​गामा याच्याशी भेट झाली. हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ब्राह्मण समाजाचे असल्याचे भासवून आरोपीने 14 वर्षांपासून पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले होते.

7 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज करताना तिच्या ही गोष्ट लक्षात आली मात्र ती गरोदर असल्याने तिने त्याच्यावर गुन्हा दाखल केला नव्हता. आता मात्र याबाबतचा सगळा खुलासा करुन लव्ह जिहाद प्रकरणी तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.