Video : हजारो वर्षांपासून दडून राहिली, अचानक समोर आली रहस्यमयी गोष्ट, समोरचं दृश्य पाहून लोक थक्क!
नर्मदा नदीच्या किनारी एक अजब दगड बाहेर आला आहे. हा दगड पाहून अनेकजण अचंबित झालेत. या दगडावर प्राण्याचे दात दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपूर्वाचा एखाद्या प्राण्याचा हा जबडा असावा, असा अंदाज लोक लावत आहेत.

Madhya Pradesh Mysterious Stone : पृथ्वीच्या पोटात अनेक चमत्कारिक गोष्टी दडलेल्या आहेत. पृथ्वीवर काय काय रहस्ये आहेत, याचा शोध अनेक संशोधक घेतात. परंतु काही प्रश्नांची उत्तरं संशोधकांना अजूनही सापडलेली नाहीत. पृथ्वीच्या पोटातून कधीकधी अशा वस्तू बाहेर येतात, त्या पाहून अनेकजण हैराण होतात. सध्या अशीच एक अजब घटना घडली आहे. नदीच्या काठावर अशी एक वस्तू बाहेर आली आहे, जिला पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ही वस्तू जमिनीखाली दडलेली होती.
घटना नेमकी कुठे घडली?
समोर आलेली ही घटना मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या किनारी घडली आहे. ही घटना समजताच लोक नदीकिनारी गर्दी करत आहेत. समोर आलेली वस्तू नेमकी काय आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागलीय.
नदीकिनारी नेमकं काय बाहेर आलं?
मिळालेल्या माहितीनुसार नर्मदा नदीच्या किनारी एक अजब दगड बाहेर आला आहे. हा दगड पाहून अनेकजण अचंबित झालेत. या दगडावर प्राण्याचे दात दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपूर्वाचा एखाद्या प्राण्याचा हा जबडा असावा, असा अंदाज लोक लावत आहेत. विशेष म्हणजे शेकडो-हजारो वर्षांपासून हा प्राणी गाडला गेलेला असवा असा अंदाज लोक लावत आहेत. दगडावर दात दिसत असल्याने असा अंदाज लावला जातोय.
रहस्यमयी दगडाची केली जातेय पूजा
नदीमधी पाण्यामुळे हा दगड अचानक दिसायला लागला. त्यानंतर हा एक दैवी चमत्कार आहे, असा दावा काही स्थानिक लोक करत आहेत. या दगडाची पूजा केली जातेय. त्याला फुल अर्पण केले जात आहेत. दरम्यान, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पुरातत्त्व विभागाची टीम आलेली असून या दगडाची चाचणी केली जाईल. त्यावर अभ्यास केला जाईल. त्यानंतरच हा दगड नेमका कशाचा आहे, हे स्पष्ट होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित परिसर रिकामा केलाय. हे अधिकारी आता दगडावर अभ्यास करत आहेत. हा दगड नेमका कशाचा आहे, हे समोर येणार आहे.