मोठी बातमी! कोट्यवधीचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीचा साथीदार सीबीआयला सुपूर्द, UAEतून प्रत्यार्पण

नीरव मोदीचा साथीदार संदीप मिस्त्री याला सीबीआयने अटक केली आहे. त्याला 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नीरव मोदी गेल्या अनेक वर्षांपासून पीएनबी घोटाळ्यामुळे चर्चेत होता.

मोठी बातमी! कोट्यवधीचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीचा साथीदार सीबीआयला सुपूर्द, UAEतून प्रत्यार्पण
neerav modi case
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 29, 2026 | 7:27 PM

नीरव मोदी PNB बँक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी संदीप मिस्त्रीला UAE मधून भारतात आणण्यात CBIला यश मिळालं आहे. CBI, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयातून संदीप मिस्त्रीचे UAEमधून डिपोर्टेशन. CBIच्या मुंबईतील BSFB युनिटकडून नीरव मोदी प्रकरणात संदीप मिस्त्रीविरोधात गुन्हा दाखल. बनावट आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांच्या माध्यमातून बँक फसवणुकीत सहभाग असल्याचा आरोपव ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान सोमवारी अटक झाल्यानंतर त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. विशेष सीबीआयच्या न्यायालयासमोर हजर केले असले तरी मात्र त्याच्या रिमांडसाठी काही प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.

कधीपर्यंत न्यायालयीन कोठडी?

नीरव मोदीच्या साथीदार संदीप मिस्त्रीला न्यायालयाने 6 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. नोव्हेंबर 2025मध्ये त्याच्यावर विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढलं होतं. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Loading...

कोण आहे संदीप मिस्त्री आणि आरोपांची यादी

दरम्यान, संदीप मिस्त्री हा नीरव मोदीच्या हॉंगकाँगमधील फँन्सी क्रिएशन लिमिटेड या कंपनीचा अध्यक्ष होता. नीरव आणि अन्य आरोपींसोबत संदीपचाही पीएनबी घोटाळ्यात सहभाग असल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. 6,498.20 कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळा देशामध्ये सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. संदीपवर अन्यही गुन्हेगारी कृत्यांचे आरोप करण्यात आलेले आहेत. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार भारतात गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीपने नीरवच्या भावासोबत मिळून दुबईतील विविध कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांना आणि डमी संचालकांना देश सोडून जाण्याची धमकी दिली होती.

विविध कंपन्यांच्या दैनंदिन कारभारावर नियंत्रण ठेवत गुप्त आणि स्वतःहून डिलीट होणाऱ्या कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचा CBIचा आरोप. हिरे, सोने आणि मोती ज्वेलरीच्या कथित बनावट आयात-निर्यात व्यवहारांसाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात सहभाग असल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. एवढेच नाही तर UAEमधील डमी कंपन्यांच्या बँक खात्यांमधून निधी वळवल्याचाही आरोप. जुलै 2026 मध्ये CBIच्या विनंतीवरून इंटरपोलमार्फत संदीप मिस्त्रीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. रेड कॉर्नर नोटीसनंतर UAEमध्ये संदीप मिस्त्रीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक

UAE प्रशासनाकडून डिपोर्टेशनची प्रक्रिया पूर्ण

28 सप्टेंबर रोजी रात्री 11.55 वाजता संदीप मिस्त्री मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत दाखल होताच CBI BSFB युनिटच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सक्षम न्यायालयात हजर केल्यानंतर संदीप मिस्त्रीची जेल कस्टडी रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यानंतर अवघ्या सुमारे दोन महिन्यांत आरोपीला UAEमधून भारतात आणण्यात यश. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तपास यंत्रणांमधील जलद समन्वयाचे उदाहरण असल्याचे CBIकडून नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, फरार नीरवलाही भारतात लवकरच आणलं जाऊ शकत अशी माहिती समोर येत आहे. तो सध्या लंडनमधील एचएमपी वँड्सवर्थ तुरुंगात बंद आहे. इडी, सीबीआय त्याच्या प्रत्यार्पणासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us