VIDEO: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून लहान मुलीसमोरच वडिलांना मारहाण, मुलीची गयावया, पोलीस बघ्याच्या भूमिकेत

| Updated on: Aug 13, 2021 | 12:50 PM

हा सर्व प्रकार सुरु असताना अहमद यांची लहान मुलगीही त्यांच्यासोबतच होती. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी तिने बरीच गयावया केली. मात्र, वडिलांना बिलगून रडणाऱ्या या चिमुरडीची कोणालाही दया आली नाही.

VIDEO: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून लहान मुलीसमोरच वडिलांना मारहाण, मुलीची गयावया, पोलीस बघ्याच्या भूमिकेत
कानपूरमध्ये बजरंग दलाची मुस्लीम व्यक्तीला मारहाण
Follow us on

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एका मुस्लीम व्यक्तीला स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षकांचा जमाव मारहाण करताना दिसत आहे. जमावातील सर्वजण बजरंग दलाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. तर मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अहमद असे आहे. अहमद यांना त्यांच्या लहान मुलीसमोर टोळक्याने मारहाण केली. टोळक्याने त्यांना बळजबरीने ‘जय श्रीराम’च्या घोषणाही द्यायला लावल्या.

हा सर्व प्रकार सुरु असताना अहमद यांची लहान मुलगीही त्यांच्यासोबतच होती. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी तिने बरीच गयावया केली. मात्र, वडिलांना बिलगून रडणाऱ्या या चिमुरडीची कोणालाही दया आली नाही. टोळक्याने मारहाण करुन झाल्यानंतर अहमद यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस आल्यानंतर अहमद यांना मारहाण सुरुच होती.

नेमकं काय घडलं होतं?

धर्मांतर करण्यासाठी एका दलित महिलेवर दबाव (conversion in muslim) आणल्याच्या आरोपातून बजरंग दलाच्या (Bajrang Dal) काही कार्यकर्त्यांनी अहमद यांना मारहाण केली. कानपूर येथील बर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. गेल्या महिनाभरापासून या परिसरात तणावाचे वातावरण होते. अहमद आपल्या शेजारी राहणाऱ्या एका दलित महिलेवर बळजबरीनं धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता, असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


पीडित महिलेनं धर्मांतर करण्यास नकार दिल्यानंतर रिक्षाचालकानं पीडितेला 20 हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं. यानंतर पीडित महिलेनं याची तक्रार पोलिसांसोबत स्थानिक आमदाराकडे केली.

इतर बातम्या:

शरद पवार म्हणाले, माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी कधीही असं पाहिलं नव्हतं, नेमकं काय घडलंय?

खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी?; संजय राऊत भडकले

Breaking : राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड, दिल्ली बलात्कार पीडित प्रकरणात फोटो पोस्ट केल्याबाबत कारवाई