Man Ki Baat: ‘अभिमानाने सांगा की हे स्वदेशी आहे’, PM मोदींचा ‘मन की बात’मधून ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातील जनतेला स्वदेशीचा मंत्र दिला.

Man Ki Baat: अभिमानाने सांगा की हे स्वदेशी आहे, PM मोदींचा मन की बातमधून व्होकल फॉर लोकलचा संदेश
man ki baat
| Updated on: Aug 31, 2025 | 3:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला. ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा आजचा 125 भाग आहे. आजच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशातील जनतेला स्वदेशीचा मंत्र दिला. देशात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्तसाहात साजरा केला जात आहे. आगामी काळात देशात विविध सण आणि उत्सव साजरे केले जाणार आहे. या सणांमध्ये स्वदेशीला विसरू नका असं पंतप्रधानांनी म्हटलं.

व्होकल फॉर लोकलवर भर

आजच्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्होकल फॉर लोकलवर भर दिला. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी वस्तूंचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘भारतात पुढील काही दिवस वेगवेगळे सण साजरे केले जाणार आहेत. या सणांमध्ये स्वदेशीला कधीही विसरू नका. तुम्ही एकमेकांना देत असलेल्या भेटवस्तू भारतात बनवलेल्या असल्या पाहिजेत. कपडे, सजावट भारतात बनवलेल्या साहित्याने केलेली असावी. दिवेही भारतात बनवलेले असावेत. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट स्वदेशी असली पाहिजे.’

विकसित भारत

आपल्या भाषणात पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘गर्वाने म्हणा की हे स्वदेशी आहे. आपल्याला या मंत्राने पुढे जायचे आहे. व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत हा त्याचा मार्ग आहे. आपले ‘विकसित भारत’ हे एक ध्येय आहे. आपण स्वदेशी उत्पादने वापरली पाहिजेत आणि अभिमानाने ती स्वदेशी आहेत असं म्हटले पाहिजे.’

नैसर्गिक आपत्तींबद्दल भाष्य

मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील काही राज्यात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पंतप्रधान म्हणाले की, ‘या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती देशाची परीक्षा घेत आहे. या काळात एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक संस्था चांगले काम करत आहेत.’

जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील स्टेडियममध्ये पहिल्यांदाच डे-नाईट क्रिकेट सामना खेळवण्यात आला. यावर बोलताना मौदींनी म्हटले की, ‘पूर्वी ते अशक्य वाटत होते, मात्र आता माझा देश बदलत आहे. पुलवामाच्या स्टेडियममध्ये लोकांना डे नाईट क्रिकेटचा आनंद घेताना पाहणे हे एक आनंददायी दृश्य होते.’