AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! हॉटेलला भीषण आग, जे रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाहीत, 9 जणांचा मृत्यू , अनेकजण गंभीर जखमी

मोठी बातमी समोर येत आहे, रात्री दोनच्या सुमारास हॉटेलला भीषण अग लागल्याची घटना घडली आहे. ही आग एवढी मोठी होती की, या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

मोठी बातमी! हॉटेलला भीषण आग, जे रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाहीत, 9 जणांचा मृत्यू , अनेकजण गंभीर जखमी
Kolkata hotel fireImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 19, 2026 | 8:55 AM
Share

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून मोठी बातमी समोर येत आहे. कोलकातामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोलकातामधल्या मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरात असलेल्या एका हॉटेलला मध्यरात्री दोन वाजता भीषण आग लागली. या घटनेत धुरामुळे श्वास गुदमरल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या हॉटेलला आग लागली आहे, त्या हॉटेलपासून अगदी हकेच्या अंतरावरच अग्निशमन दलाचं ऑफीस आहे. मात्र असं असताना देखील या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांनी आपला जीव गमावला आहे, या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एक बंगलादेशी नागरिक देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे. रात्री दोनच्या सुमारास आग लागल्यामुळे अनेकजण झोपेत असल्यामुळे हॉटेलच्या इमारतीला आग लागल्याचं लवकर कळालं नाही, त्यामुळे मोठा घात झाला, धुरामुळे श्वास कोंडला आणि त्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आगीचं कारण अस्पष्ट 

दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली? याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु शॉर्ट सर्किट किंवा एसीचा स्फोट होऊन ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने  तातडीने घटनास्थळी धाव घेतली, सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत, जखमींना तातडीने उपचारासठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्रीच्या सुमासार ही आग लागल्यामुळे या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात