PM Modi: भेटवस्तूंचा लिलाव! पीएम नरेंद्र मोदींच्या उपक्रमाचे कौतुक, सोशल मीडियावर मोठी चर्चा
PM Modi Gifts Auction: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील अनेक देशांचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला, तसे त्यांना अनेक खेळाडू, सेलिब्रिटी आणि नागरिकांनी भेटवस्तू दिल्या आहेत. त्यांच्याकडे या वस्तूंचा खजिना झाला आहे. या वस्तू लोकोपयोगी याव्यात आणि त्यातून सामाजिक हित जपण्याचा उपक्रम मोदी यांनी जपला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशोदेशीचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. त्यासोबतच त्यांना अनेकांनी अविस्मरणीय अशा भेटवस्तूही दिल्या आहेत. अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, खेळाडू, सेलिब्रिटी, नागरिकांकडून त्यांना वस्तू भेट देण्यात आल्या आहेत. त्यात उंची वस्त्रापासून ते महामानवांच्या विविध आकारातील मूर्ती, काही खास गिफ्ट यांचा समावेश आहे. पंतप्रधानांकडे या वस्तूंचा खजिनाच तयार झाला आहे. पण याबाबत पंतप्रधान मोदी यांनी एक नवीन पायंडा पाडला. परंपरा सुरू केली आहे. त्यांनी या वस्तू स्वतःच्या संग्रहात ठेवल्या नाही. लोकोपयोगासाठी, सामाजिक हितासाठी त्यांनी या वस्तूंचा लिलाव केला आहे. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचवेळी काऊंसिलेंज इंडियाचे व्यवस्थापकीय सहकारी सुहेल सेठ यांनी समर्पक बाजू मांडली आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. त्यामागील सद्भावना विषद केली आहे.
मुख्यमंत्रीपदापासूनच स्तुत्य उपक्रम
मोदींनी मुख्यमंपदापासूनच हा शिरस्ता नेटाने राबवल्याचे कौडकौतुक सुहेल सेठ यांनी त्यांच्या लेखात केले आहे. सामान्यपणे जेव्हा बड्या लोकांकडे जगातील अत्यंत महागड्या, मनमोहक वस्तूंचा खजिना तयार होतो, तेव्हा ती मिरवण्याची सुप्त इच्छा समोर येते. काही लोक या वस्तूंचा, भेटवस्तूंचा बडेजाव मिरवतात. पण पंतप्रधान मोदी यांनी या पंरपरेला फाटा दिला. त्यांनी या वस्तू संग्रही न ठेवता, त्यांचा लिलाव करून त्याचा लोकोपयोग केल्याचे कौतुक या लेखातून करण्यात आले आहे.
निधीचा कल्याणकारी कामांसाठी वापर
पंतप्रधान मोदी यांना महागड्या शॉल, मूर्ती, तलवार, खेळाडूंची स्वाक्षरी असलेली बॅट आणि इतर बेशकिंमती, सुबक वस्तू मिळाल्या आहेत. या वस्तू शासकीय गोदामात, संग्रहालयात पडून राहण्याऐवजी मोदी यांनी त्यांचा पारदर्शक लिलाव राबवला. या लिलावातून जी रक्कम जमा होते. हा निधी लोकहितासाठी वापरल्या जातो. ही रक्कम गुजरातमधील कन्या केलवणी निधी (बालिका शिक्षण) राष्ट्रध्वज निर्मिती आणि गंगा शुद्धीकरणाशी संबंधित नमामि गंगे यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी वापरल्या जातो. मोदींचे हे सामाजिक भान सुहेल सेठ यांनी लेखातून अधोरेखित केले आहे. पंतप्रधानांचा हा आदर्श सर्वसामान्यांसाठी एक प्रेरणा आहे. ते सुद्धा या प्रक्रियेत सहभागी होतात. ते वस्तू खरेदी करतात, तेव्हा ते सुद्धा या मोहिमांचा, उपक्रमांचे भागीदार होतात, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे.
When you give all you get, for causes you believe in… @narendramodi @PMOIndia pic.twitter.com/qS54qR6GIn
— SUHEL SETH (@Suhelseth) September 25, 2026
नीरज चोप्राच्या भालावरून वाद
नीजर चोप्रा याने मोदी यांना भाला भेट दिला होता. त्या भाल्याचाही लिलाव झाला. त्यावरून वाद झाला. पण जगात खेळाशी संबंधित वस्तूंचा लिलाव होत असल्याचे लेखात म्हटले आहे. भाल्याचा लिलाव झाल्याने त्याची चर्चा झाली. अनेक खेळाडू, तरुणांची उत्सुकता चळवळली. खेळाविषयी, खेळाडूविषयी आणि लिलाव प्रक्रियेविषयी त्यांनी इंटरनेटचे मायाजाळ धुंडाळले. त्यात वावगे काहीच नाही. जनहिताच्या कामासाठी एक पारदर्शक लिलाव प्रक्रिया होत असल्याचा सूर या लेखातून आळवल्या गेला.