AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Cabinet Big Decision : मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय, सहा पिकांवर MSP वाढवण्यासह 2.79 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Modi Cabinet Big Decision : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ समितीने आज तीन मोठे निर्णय घेतले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. MSP वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे.

Modi Cabinet Big Decision : मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय, सहा पिकांवर MSP वाढवण्यासह 2.79 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
PM Modi
| Updated on: Sep 30, 2026 | 6:04 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आर्थिक विषयांच्या कॅबिनेट समितीने मार्केटिंग सीजन 2027-28 साठी रबी पिकांच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव वाढवायला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. रबी हंगामातील सहा पीकांच्या हमीभाव वाढीला सरकारने मंजुरी दिली. यात सर्वात जास्त वाढ करडईच्या पीकाला दिली आहे. करडईचा भाव आता 675 रुपये प्रती क्विंटल असेल. सर्वात कमी वाढ गव्हाच्या MSP ला दिली आहे. गहू 25 रुपये प्रति क्विंटल आहे.

केंद्र सरकारने मार्केटिंग सीजन 2027-28 साठी गहू, बार्ली, चणा, मसूर, मोहरी आणि कुसुम यांच्या MSP मध्ये वाढ केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांबद्दल माहिती दिली. दीर्घकाळ चालणाऱ्या कार्यक्रमाबद्दलही कॅबिनेटने निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. PM धारा त्या कार्यक्रमाचं नाव आहे. रिन्यूएबल एनर्जीसाठी आवश्यक असलेल्या ग्रीड आणि स्मार्ट ग्रीड इंफ्रास्ट्रक्चरचा हा प्रोग्रॅम आहे. देशाच्या वीज उत्पादनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिन्यूएबल एनर्जी ऊर्जा स्त्रोचा मोठ्या प्रमाणात समावेश केला आहे. अनेक देशांना हे करणं जमलेलं नाही असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

तिसरा निर्णय कुठला?

मोदी मंत्रिमंडळाचा तिसरा निर्णय हा दिल्लीच्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमशी संबंधित आहे. राजधानीसाठी Intelligent Traffic Management System ला मंजुरी देण्यात आली आहे. टेक्लनोलॉजीच्या मदतीने ट्रॅफिकवर लक्ष ठेवणं आणि व्यवस्थापन अजून सुधारणावर भर दिला आहे. वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षा आणि वाहनांची ये-जा चांगल्या पद्धतीने सांभाळण्यासाठी ITMS चा वापर होईल.

कुठल्या योजनेसाठी सर्वाधिक तरतूद?

मंत्रिमंडळाने जे प्रस्ताव मंजूर केलेत, त्यांचं एकूण मूल्य 2,79,157 कोटी रुपये आहे. पीएम धारा योजनेसाठी सर्वात मोठ्या रक्कमेची तरतूद केली जाईल. ही रक्कम 1,86,405 कोटी रुपये आहे. त्याशिवाय दिल्लीच्या ITMS योजनेवरील अंदाजित खर्च 1790 कोटी रुपये आहे.

Follow Us
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?