
अमेरिकेची एजन्सी मूडीज रेटिंग्सने सोमवारी भारताची लॉन्ग टर्म लोकल आणि फॉरेन करन्सी इश्यूअर रेटिंगला Baa3 वर कायम ठेवलं आहे. त्याशिवाय लोकल करेन्सीला सीनियर अनसिक्योर्ड रेटिंग सुद्धा Baa3 वर आहे.सोप्या शब्दात सांगायच झाल्यास या रेटिंग्स दाखवून देतात की, भारताची कर्ज चुकवण्याची क्षमता किती आहे. मग ते कर्ज भले आपल्या चलनात असो किंवा परदेशी. सीनियर अनसिक्योर्ड रेटिंगचा अर्थ आहे, कुठल्याही गॅरेंटीशिवाय घेतलेलं कर्ज फेडण्याची भारताची ताकद कायम आहे.
मूडीजने भारताच्या शॉर्ट-टर्म लोकल करेंसी रेटिंगला P-3 वर कायम ठेवलय. हे रेटिंग्स आणि आऊटलूक दाखवून देतात की, भारताची इकोनॉमी वेगाने वाढत आहे असं मूडिजने म्हटलय. एक्सटर्नल पोजीशन (बाहेरची आर्थिक स्थिती) मजबूत आहे. देशांतर्गत फायनान्सचा बेस सुद्धा सॉलिड आहे. चांगली रेटिंग असण्याचा अर्थ असा आहे की,अमेरिकेने लावलेला हाय टॅरिफ आणि ग्लोबल पॉलिसीज या बाहेरच्या आव्हानांसमोर टिकून राहता येतं. भारताच्या कर्ज चुकवण्याच्या क्षमतेमुळे काही लॉन्ग-टर्म फिस्कल कमकुवत बाजू बॅलन्स होतात. चांगला जीडीपी ग्रोथ आणि हळूहळू फिस्कल स्ट्रेंथ वाढूनही भारताच हाय डेट बर्डन कमी व्हायला वेळ लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताची आर्थिक प्रगती बाधित करायची आहे, पण असं होताना दिसत नाहीय.
भारताची सॉवरेन रेटिंग ‘BBB-‘ वाढवून ‘BBB’
अलीकडच्या काही फिस्कल पावलांमुळे खासगी विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या योजनेमुळे सरकारचा रेवेन्यू बेस कमजोर झालाय. रिपोर्टमध्ये हे सुद्धा म्हटलय की, भारताची लॉन्ग-टर्म लोकल करेंसी (LC) बॉन्ड सीलिंग A2 आणि फॉरेन करेंसी (FC) बॉन्ड सीलिंग A3 कायम आहे. याआधी 14 ऑगस्ट रोजी S&P ग्लोबल रेटिंग्सने भारताची सॉवरेन रेटिंग ‘BBB-‘ वाढवून ‘BBB’ केलेली.
GDP ग्रोथ 6.7 टक्के
EY ने आपल्या ‘इकोनॉमी वॉच’ रिपोर्टमध्ये भारतासाठी आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये रियल GDP ग्रोथ अंदाज आधीपेक्षा 6.5% टक्क्याने वाढवून 6.7% केलय. जून तिमाहीत 7.8% मजबूत GDP ग्रोथ आणि GST रिफॉर्मसमुळे मागणीत झालेली वाढ हे एक कारण आहे. सामान आणि सर्विसेसच्या निर्यातीवर परिणाम करणाऱ्या जागतिक आव्हनांमुळे भारताच्या विकासात अडचणी येऊ शकतात. EY ला अपेक्षा आहे की, FY 26 मध्ये भारताचा रिअल GDP ग्रोथ 6.7 टक्के राहील.