Mukesh Ambani: मुकेश अंबानी झाले आजोबा, मुलगी ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म

मुकेश अंबानी यांची मुलगी इशा पिरामिल हिने जुळ्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी हे आता आजोबा झाले आहेत.

Mukesh Ambani: मुकेश अंबानी झाले आजोबा, मुलगी ईशाने दिला जुळ्या मुलांना जन्म
इशा आणि आनंद पिरामिल
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 20, 2022 | 4:03 PM

मुंबई,  देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आजोबा झाले आहेत.  यांची मुलगी ईशा (Isha) पिरामल हिने जुळ्या मुलांचा जन्म दिला. अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंबाकडून याची माहिती देण्यात आली. ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला (Twins born), ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे.  ईशा आणि आनंद पिरामल  संसाररूपी वेलीवर ही दोन नवीन फुलं उमलल्याने पिरामीला आणि अंबानी या दोनीही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आई ईशासोबत दोन्ही मुलंही निरोगी आहेत. मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया असे सांगण्यात आले आहे.

दोनीही कुटुंबीयांनी मीडियाला दिली माहिती

अजय आणि स्वाती पिरामल, ईशा अंबानीचे पती आनंद पिरामल यांचे पालक मुकेश आणि नीता अंबानी यांनी मीडियाला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की,  जुळ्या मुलांच्या आगमनाची घोषणा करताना त्यांना खूप आनंद होत आहे आणि ते सर्व खूप आनंदी आहेत. आशीर्वाद आणि शुभेच्छांची अपेक्षा आहे.

2018 मध्ये झाला होता ईशा आणि आनंद पिरामल यांचा विवाह

2018 मध्ये, ईशा अंबानीने हेल्थकेअर बिझनेस ग्रुप पिरामलचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नाचा देशातील सर्वात महागड्या लग्नांच्या यादीत समावेश आहे, ज्यामध्ये देशातील, बॉलिवूड आणि जगभरातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.

ईशा अंबानी आहेत रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालिका

मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी हिला नुकतीच रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची संचालक बनवण्यात आली आहे. मुकेश अंबानींच्या तीन मुलांपैकी ईशा अंबानी सर्वात मोठी आहे. त्यांनी अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. त्याच वेळी, त्यांनी स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया येथून व्यवसायात एमबीएचे शिक्षण घेतले आहे.