AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata : मुकेश अंबानींनतर टाटा ग्रुप पण या व्यवसायात टाकणार पाऊल..उघडणार 20 स्टोअर..

Tata : मुकेश अंबानीनंतर टाटा समूह ही या व्यवसायात उडी घेण्याच्या तयारीत आहे..

Tata : मुकेश अंबानींनतर टाटा ग्रुप पण या व्यवसायात टाकणार पाऊल..उघडणार 20 स्टोअर..
टाटा या क्षेत्रात अजमावणार नशीबImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 18, 2022 | 11:10 PM
Share

नवी दिल्ली : मीठापासून ते विमान व्यवसायापर्यंत टाटा समूहाचा(Tata Group) प्रत्येक व्यवसायात दबदबा आहे. आता टाटा समूहाने या व्यवसायात उडी घेण्याची तयारी केली आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने यापूर्वीच या व्यवसायात (Business) नशीब आजमाविण्याची घोषणा केली आहे.

Tata Group आता कॉस्मेटिक व्यवसायात उतरणार आहे. 18 ते 45 वयोगट हा टाटा समूहाचे टार्गेट राहणार आहे. या क्षेत्रात LVMH Sephora आणि Nykaa या ब्रँडचे मोठे आव्हान या ग्रुपसमोर असेल.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, देशातील 157 वर्षांहून अधिक जूने व्यावसायिक कुटुंब, टाटा समूह ब्युटी टेक क्षेत्रात पाऊल टाकत आहे. टाटा देशभरात जवळपास 20 ब्यूटी टेक आऊटलेट्स (Beauty Tech Outlets) उघडण्याची तयारी करत आहे.

यासंबंधी समूहाची परदेशातील ब्रँडशी चर्चा सुरु आहे. जगातील दुसऱ्या सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात ब्यूटी आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स बाजार तेजीत आहे. सध्या भारतातील हा बाजार 16 अरब डॉलर इतका झाला आहे.

बिझनेस टुडेमध्ये रॉयटर्सचा एक अहवाल छापण्यात आला आहे.त्यानुसार टाटा समूह ब्युटी अँड पर्सनल केअरमध्ये पाऊल टाकत आहे. 18 ते 45 वयोगट हा टाटा समूहाचे टार्गेट राहणार आहे.

सौंदर्य प्रसाधन आणि सेवेच्या जगतात जोरदार पुनरागमन करण्यासाठी टाटा समूह The Honest Company, Ellis Brooklyn आणि Gallinee यासारख्या ब्रँडशी करार करण्याच्या तयारीत आहे.

टाटाच नाहीतर त्याअगोदर रिलायन्स इंडस्ट्रीजनेही या क्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स ब्युटी अँड कॉस्मेटिक जगतात ठसा उमटविण्यासाठी तयार आहे. रिलायन्स या उद्योगात 400 रिटेल स्टोअर्स सुरु करण्याच्या तयारीत आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.