मुलायम सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही; तब्बेत आणखी बिघडली…

| Updated on: Oct 07, 2022 | 5:40 PM

माजी मुख्यमंत्री असलेले आणि 82 वर्षाचे मुलायम सिंह यादव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत, मात्र आता गेल्या पाच दिवसांपूर्वी प्रकृती होती, त्यापेक्षा त्यांनी प्रकृती अधिक खालवली आहे.

मुलायम सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही; तब्बेत आणखी बिघडली...
Follow us on

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशच माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Former CM Mulayam singh yadav) यांची प्रकृती गेल्या पाच दिवसांपेक्षा अधिक नाजूक असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. मुलायम सिंह यांच्यावर हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून ते उपचार सुरुच ठेऊन हेल्थ बुलेटिनही (Health Bulletin) काढण्यात आले आहे. सध्या त्याना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून 2 ऑक्टोबर रोजी मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली होती.

माजी मुख्यमंत्री असलेले आणि 82 वर्षाचे मुलायम सिंह यादव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत, मात्र आता गेल्या पाच दिवसांपूर्वी प्रकृती होती, त्यापेक्षा त्यांनी प्रकृती अधिक खालवली आहे.

गेल्या काही तासांपासून त्यांच्या प्रकृतीत कोणत्याही सुधारणा झाल्या नसल्याने त्यांचा चिरंजीव माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य दिल्लीमध्येच थांबून आहेत.

दरम्यान, मुलायम सिंह यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठकही आता मेदांतामध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक चिंतेत आहेत. त्यांनी हेही सांगितले की, मी डॉक्टर आणि कुटुंबीयांही बरोबरही बोललो असून त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांना 24 जूनमध्येही मेदांता रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. त्यांच्या आरोग्याची तपासणी करुन त्यांना औषध गोळ्या देऊन घरी सोडण्यात आले होते.

त्यानंतर मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी पत्नी साधना गुप्ता यांचे 9 जुलै रोजी निधन झाले होते. त्यांनीही गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला होता. मात्र त्या गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी होत्या.